मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात अभिनेता हेमंत बिरजे जखमी झाले आहेत. हेमंत बिरजे यांच्यासह त्यांची पत्नी रेश्मा आणि मुलगी आमना यादेखील जखमी झाल्या आहेत. ऊर्से टोलनाक्यावर हा अपघात झाला. गाडी दुभाजकाला धडकली आणि यामध्ये तिघेही जखमी झाले. तिघांवर सध्या पवना रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “बॉलिवूड अभिनेता हेमंत बिरजे आपल्या पत्नी आणि मुलीसह प्रवास करत असताना हा अपघात झाला. ऊर्से टोलनाक्याजवळ रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कारने दुभाजकाला धडक दिली. अपघातात पत्नी आणि मुलीलाही दुखापत झाली आहे”. हेमंत बिरजे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

vasai pelhar police marathi news, hit and run vasai latest marathi news
‘हिट ॲण्ड रन’च्या आरोपीला पंजाब मधून अटक, ६० सीसीटीव्ही तपासून पेल्हार पोलिसांची कारवाई
Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
uran, irresponsible, heavy vehicle parking, cause accident, jnpt palaspe national highway, marathi news,
उरणमध्ये बेदरकार अवजड वाहनांची दहशत कायम
Traffic Causes Jam, continuous Holidays, Tourists Head, Lonavala, Mumbai Pune Expressway, marathi news,
सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर कोंडी, उन्हाळ्यामुळे मुंबईतील पर्यटक लोणावळ्यात दाखल

सर्दीच्या गोळ्यांनी केला घात –

रुग्णालयात दाखल हेमंत बिरजे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “सर्दी झाली म्हणून गोळ्या खाल्ल्या होत्या. त्यामुळे डुलकी लागली आणि गाडी जाऊन दुभाजकावर आदळली. त्यानंतर गाडीवर नियंत्रण मिळवलं. गाडीत मी, माझी पत्नी आणि मुलगी असे तिघेच प्रवास करत होतो. काही गंभीर दुखापत झालेली नाही”.

अभिनेते हेमंत बिरजे यांचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात, पत्नीही जखमी; रुग्णालयात दाखल

हेमंत बिरजे यांनी सांगितल्यानुसार, “ते मुंबईहून पुण्याला निघाले होते. तिथे आमचं घर असून तिथे राहण्यासाठी चालला होते. तिकडे जाऊन आराम करण्याचा विचार होता”.

हेमंत बिरजे यांचा परिचय

१९८५ मध्ये आलेल्या ‘टार्जन’ चित्रपटामुळे हेमंत बिरजे प्रसिद्धीस आले होते. पण सध्या मात्र बॉलिवूडपासून दूर आहेत. ते यश ते पुढे टिकवू शकले नाहीत आणि बॉलिवूडपासून दूर होत गेले. हेमंत बिरजे सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचे. दिग्दर्शक बब्बर सुभाष आपल्या चित्रपटासाठी अभिनेत्याचा शोध घेत असताना त्यांची नजर हेमंत बिरजे यांच्यावर पडली होती. त्यानंतर हेमंत बिरजे यांना पहिला चित्रपट मिळाला. अभिनेत्री किमी काटकरसोबतच्या काही बोल्ड सीनमुळे चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती.

पण नंतर फ्लॉप चित्रपटांमुळे त्यांना काम मिळणं बंद होत गेलं आणि फक्त एका चित्रपटापुरते लक्षात राहिले. यामुळे त्यांना आर्थिक संकटाचाही सामना करावा लागला. २०१६ मध्ये घरमालकाने त्यांना घराबाहेर काढल्याची माहितीही समोर आली होती.