पुणे : लोणावळ्यातील फार्महाऊसची वीज कट केल्याने एका बॉलिवूड अभिनेत्रीने महावितरणवर ‘माफियागिरी’चा आरोप करत समाजमाध्यमांवर संताप व्यक्त केला होता. त्यावर वीजबिल थकल्याने नियमांनुसार कारवाई केली असून, आता ३ हजार रुपयांचे देयक भरल्याने संबंधित अभिनेत्रीच्या फार्महाऊसचा वीजपुरवठा सुरू केल्याचे अधिकृत स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे.
थकीत वीजबिलामुळे एक बॉलिवूड अभिनेत्रीच्या लोणावळा येथील फार्महाऊसचा २६ सप्टेंबर रोजी खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा बुधवारी (दि. ३०) वीजबिल भरल्यानंतर महावितरणकडून तातडीने पूर्ववत करण्यात आला आहे, अशी माहिती महावितरणकडून निवेदनाद्वारे देण्यात आली.
लोणावळा येथील फार्महाऊससाठी संबंधित अभिनेत्रीच्या नावावर महावितरणची तीन फेजची वीजजोडणी आहे. मोठ्या परिसरात असलेल्या या फार्महाऊसचे वीजमीटर प्रवेशद्वारापासून सुमारे ३०० फूट अंतरावर आहे. प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक तैनात असल्याने मीटर रीडिंगसाठी तेथील व्यवस्थापकाची (केअरटेकर) परवानगी घ्यावी लागते.
Maharashtra state electricity board in lonavala are behaving like mafia ! They are giving huge bills and forcing payment by cutting off electricity. This is just criminal! Coming on a Saturday evening to cut off the electricity even if it is before the due date and just holding…
— Tanishaa S Mukerji (@TanishaaMukerji) September 29, 2026
महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, मुखर्जी यांनी जुलै २०२६ चे वीजबिल ५ ऑगस्ट रोजी भरले होते. जुलैनंतर ऑगस्ट व सप्टेंबर अशा दोन महिन्यांची देयके तयार झाली. ऑगस्ट महिन्याच्या वीजबिलाची मुदत ४ सप्टेंबर रोजी संपली. त्यानंतर नियमानुसार या अभिनेत्रीला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वीजबिलाची नोटीस SMS द्वारे देण्यात आली. १९ सप्टेंबर रोजी नोटीशीची मुदत संपल्यानंतरही तेथील व्यवस्थापकास वीजबिल भरण्याची विनंती स्थानिक वीज कर्मचाऱ्यांनी वारंवार केली. तरीही वीजबिल न भरल्याने शेवटी महावितरणने नियमानुसार २६ सप्टेंबर रोजी वीजपुरवठा खंडित केला.
तीन हजार रुपये भरल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत
बुधवारी (दि. ३०) दुपारी संबंधित अभिनेत्रीने ऑनलाईन पद्धतीने ३ हजार रुपयांचे देयक भरले. त्यानंतर महावितरणने तातडीने वीजपुरवठा पूर्ववत केला. ‘वीजबिल थकीत राहिल्यास नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते. तसेच थकित बिलाचा भरणा झाल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत केला जातो. या प्रकरणातही महावितरणने नियमानुसार कारवाई करून वीजबिलाचा भरणा होताच वीजपुरवठा पूर्ववत केला आहे,’ असे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी एका अभिनेत्रीने महावितरण लोणावळ्यात माफियासारखं वागत असल्याचा आरोप केला होता. महावितरणने अवाढव्य बिलं देऊन शनिवारी संध्याकाळी मुदतीआधीच वीज तोडल्याची तक्रार तिने केली होती. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टॅग करत हस्तक्षेपाची मागणीही केली होती.लोणावळ्यातील फार्महाऊसची वीज कट केल्याने एका बॉलिवूड अभिनेत्रीने महावितरणवर ‘माफियागिरी’चा आरोप करत समाजमाध्यमांवर संताप व्यक्त केला होता. त्यावर वीजबिल थकल्याने नियमांनुसार कारवाई केली असून, आता ३ हजार रुपयांचे देयक भरल्याने संबंधित अभिनेत्रीच्या फार्महाऊसचा वीजपुरवठा सुरू केल्याचे अधिकृत स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे.
थकीत वीजबिलामुळे एक बॉलिवूड अभिनेत्रीच्या लोणावळा येथील फार्महाऊसचा २६ सप्टेंबर रोजी खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा बुधवारी (दि. ३०) वीजबिल भरल्यानंतर महावितरणकडून तातडीने पूर्ववत करण्यात आला आहे, अशी माहिती महावितरणकडून निवेदनाद्वारे देण्यात आली.
लोणावळा येथील फार्महाऊससाठी संबंधित अभिनेत्रीच्या नावावर महावितरणची तीन फेजची वीजजोडणी आहे. मोठ्या परिसरात असलेल्या या फार्महाऊसचे वीजमीटर प्रवेशद्वारापासून सुमारे ३०० फूट अंतरावर आहे. प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक तैनात असल्याने मीटर रीडिंगसाठी तेथील व्यवस्थापकाची (केअरटेकर) परवानगी घ्यावी लागते.
महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, मुखर्जी यांनी जुलै २०२६ चे वीजबिल ५ ऑगस्ट रोजी भरले होते. जुलैनंतर ऑगस्ट व सप्टेंबर अशा दोन महिन्यांची देयके तयार झाली. ऑगस्ट महिन्याच्या वीजबिलाची मुदत ४ सप्टेंबर रोजी संपली. त्यानंतर नियमानुसार या अभिनेत्रीला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वीजबिलाची नोटीस SMS द्वारे देण्यात आली. १९ सप्टेंबर रोजी नोटीशीची मुदत संपल्यानंतरही तेथील व्यवस्थापकास वीजबिल भरण्याची विनंती स्थानिक वीज कर्मचाऱ्यांनी वारंवार केली. तरीही वीजबिल न भरल्याने शेवटी महावितरणने नियमानुसार २६ सप्टेंबर रोजी वीजपुरवठा खंडित केला.
तीन हजार रुपये भरल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत
बुधवारी (दि. ३०) दुपारी संबंधित अभिनेत्रीने ऑनलाईन पद्धतीने ३ हजार रुपयांचे देयक भरले. त्यानंतर महावितरणने तातडीने वीजपुरवठा पूर्ववत केला. ‘वीजबिल थकीत राहिल्यास नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते. तसेच थकित बिलाचा भरणा झाल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत केला जातो. या प्रकरणातही महावितरणने नियमानुसार कारवाई करून वीजबिलाचा भरणा होताच वीजपुरवठा पूर्ववत केला आहे,’ असे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी एका अभिनेत्रीने महावितरण लोणावळ्यात माफियासारखं वागत असल्याचा आरोप केला होता. महावितरणने अवाढव्य बिलं देऊन शनिवारी संध्याकाळी मुदतीआधीच वीज तोडल्याची तक्रार तिने केली होती. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टॅग करत हस्तक्षेपाची मागणीही केली होती.
