scorecardresearch

Premium

बोपखेल दंगलीतील जखमी पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

आंदोलनाला हिंसक वळण लागून पोलीस व ग्रामस्थांमध्ये धुमश्चक्री उडाली होती. पोलिसांकडून लाठीमार, तर ग्रामस्थांकडूनही पोलिसांवर हल्लाबोल करण्यात आला होता.

बोपखेल दंगलीतील जखमी पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

दापोडीतील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाने बंद केलेला रस्ता पुन्हा सुरू करण्यासाठी बोपखेलच्या ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लावून भडकलेल्या दंगलीत ग्रामस्थांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा शुक्रवारी मृत्यू झाला.
रामदास बांगर, असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बोपखेलमधून दापोडीकडे जाण्यासाठी लष्करी हद्दीतून असलेला रस्ता लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाने बंद केल्यानंतर ग्रामस्थांनी २१ मे रोजी त्या विरोधात आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागून पोलीस व ग्रामस्थांमध्ये धुमश्चक्री उडाली होती. पोलिसांकडून लाठीमार, तर ग्रामस्थांकडूनही पोलिसांवर हल्लाबोल करण्यात आला होता. त्यात बांगर गंभीर जखमी झाले होते.
बांगर यांच्यावर सुरुवातीला भोसरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारक करण्यात आले होते. प्रकृती सुधारली असल्याने आठ दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र, घरी गेल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर मागील अडीच महिन्यांपासून उपचार सुरू होते. शुक्रवारी दुपारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

acb arrests circle officer while accepting rs 50 000 bribe in navi mumbai
नवी मुंबई: जमीन हस्तांतरण अहवाल सकारात्मक करण्यास ५० हजाराची लाच ….. आरोपी सापळ्यात अडकला 
High court observation separate living of married couple
पत्नीने पतीच्या नोकरीच्या शहरात वास्तव्याचा आग्रह धरणे क्रुरता नाही
MCOCA against gang robbing passengers old Mumbai-Pune road
जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर प्रवाशांना लुबाडणाऱ्या टोळीविरुद्ध ‘मोक्का’
Ananda Germany a member of the German gang under Mokka was poisoned in police custody in Ichalkaranji
मोक्का अंतर्गत जर्मन टोळीतील आनंदा जर्मनीसह दोघांचे पोलीस कोठडीत विषप्राशन; घटनेने इचलकरंजीत खळबळ

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bopkhel rumpus police death

First published on: 21-08-2015 at 03:05 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×