पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोर घाटातील वाहतूक शनिवारी सकाळी वाहतूक विस्कळीत झाली. मुंबईहून लोणावळ्याकडे येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूकीचा वेग संथ झाला.
शनिवार, रविवार सुट्टी असल्याने मुंबईतील अनेक जण पर्यटनासाठी लोणावळा, खंडाळ्याकडे निघाले. शनिवारी सकाळी सातपासून बोर घाटात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुंबईहून लोणावळ्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक विस्कळीत झाली.
घाटातील वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर खालापूरपर्यंत वाहतूक विस्कळीत झाली. मोठ्या संख्येने मोटारी घाट मार्गात आल्याने वाहतूुकीचा वेग संथ झाला. महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याासाठी प्रयत्न केले. नववर्ष स्वागतासाठी लोणावळा, खंडाळा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होती. मुंबईकर पर्यटक मोठ्या संख्येने लोणावळा, खंडाळ्यात दाखल होतात. नाताळापासून लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी वाढू लागते.
