scorecardresearch

पुणे : प्रेमसंबंध तोडल्याने प्रेयसीचे विवस्त्रावस्थेतील छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित

या प्रकरणी देवेंद्र धरमचंद फुलफगर (रा. शिरुर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : प्रेमसंबंध तोडल्याने प्रेयसीचे विवस्त्रावस्थेतील छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित
प्रातिनिधिक फोटो-लोकसत्ता

शिरुरमधील एकाच्या विरोधात गुन्हा

प्रेमसंबंध तोडल्यानंतर प्रियकराकडून दिल्या जाणाऱ्या त्रासामुळे पोलिसांकडे तक्रार दिल्याने प्रियकराने प्रेयसीचे विवस्त्रावस्थेतील छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरुरमधील एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी देवेंद्र धरमचंद फुलफगर (रा. शिरुर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी आणि फुलफगर यांच्यात प्रेमसंबध होते. त्यांच्यात वाद झाल्याने तरुणीने फुलफगरशी असलेले प्रेमसंबंध तोडले. त्यानंतर आरोपीने तरुणीला त्रास दिल्याने तिने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर फुलफगर याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फुलफगर गुन्हा मागे घेण्यासाठी तरुणीवर दबाब आणत होता. गुन्हा मागे न घेतल्याने त्याने प्रेयसीचे विवस्त्रावस्थेतील छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित केले. हा प्रकार तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 15:21 IST

संबंधित बातम्या