scorecardresearch

पुणे : रामटेकडी पुलाजवळ एसटीचा ब्रेक फेल, पाच वाहनांना धडक; चार ते पाच नागरिक जखमी

सांगोला ते स्वारगेट एसटी बस हडपसर येथील रामटेकडी पुलावरून १०० फुट अंतर पुढे आल्यावर एसटीचा ब्रेक फेल झाल्याची घटना घडली.

Brake failure of ST bus near Ramtekdi bridge
या घटनेत पाच वाहनांना धडक दिली असून चार ते पाच नागरिक जखमी झाले आहेत.(फोटो- लोकसत्ता टीम)

पुणे : सांगोला ते स्वारगेट एसटी बस हडपसर येथील रामटेकडी पुलावरून १०० फुट अंतर पुढे आल्यावर एसटीचा ब्रेक फेल झाल्याची घटना घडली. या घटनेत पाच वाहनांना धडक दिली असून चार ते पाच नागरिक जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगोला ते स्वारगेट एसटी बस हडपसर येथील रामटेकडी पुलावरून रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास १०० फुट अंतर पुढे आल्यावर चालकाने वाहकाला सांगितले की, ब्रेक फेल झाला आहे. त्यावेळी बसमध्ये ३० प्रवासी होते. त्यावेळी सर्व प्रवासी घाबरले आणि आरडाओरड करण्यास सुरुवात केली.

policeman-dead
मुंबई: गस्तीवरील पोलिसाचा मृत्यू
Cell phone theft in immersion procession
विसर्जन मिरवणुकीत मोबाइल चोरट्यांचा उच्छाद…पोलिसांच्या ‘लॉस्ट अँड फाऊंड’ पोर्टलवर ‘एवढ्या’ नागरिकांनी केल्या तक्रारी
roads waterlogged traffic disrupted due to heavy rain in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये संततधार;पाणी साचल्याने रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी
shiva bhakta killed in truck accident
काळाचा घाला… कावडधारी शिवभक्ताचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

आणखी वाचा-पुणे : फ्लेक्स फाडल्यामुळे गणेश पेठेत तरुणाचा खून, गुन्हे शाखेकडून दोघे अटकेत

बसमधील सर्व प्रवाशांना समजण्याच्या आतमध्ये पुढील दुचाकी ३ आणि २ चारचाकी अशा वाहनांना जोरात धडक दिली. या घटनेत चार ते पाच जण जखमी झाले असून जखमींना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या अपघातामुळे लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Brake failure of st bus near ramtekdi bridge five vehicles hit svk 88 mrj

First published on: 21-11-2023 at 20:53 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×