पुण्यातील चांदणी चौकातील पूल उभारण्यासाठी १९९२ मध्ये २० ते २५ लाखांच्या आसपास खर्च आला होता. तर हा पूल पाडण्यासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्च आल्याची माहिती समोर आली आहे. हा पूल पाडण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला.पण एकाच स्फोटात कंपनीला जमीनदोस्त करण्यात अपयश आले.त्यामुळे हा पुल बांधणारी व्यक्ती किंवा कंपनी कोणती याचा शोध सुरू होता.त्यावरून सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस देखील पडला.मात्र अखेर हा पूल बांधणार्‍या कंपनी पर्यन्त पोहोचलो. सतीश मराठे आणि अनंत लिमये यांच्या बार्ली इंजिनिअर्स कंपनीने चांदणी चौकातील हा पूल १९९२ मध्ये उभारला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- लोणावळा : एकवीरा देवीच्या गडावर महानवमी होम

त्या पार्श्वभूमीवर सतीश मराठे यांच्याबरोबर संवाद साधला असता ते म्हणाले की,चांदणी चौकातील पूल १९९२ मध्ये आम्ही बांधला.पण त्यावेळी पूल बांधताना अनेक अटी घालण्यात आल्या होत्या.त्यातील मुख्य अट अशी होती की,बाजूला एनडीए असल्याने त्या पुलावरून रणगाडा देखील जाऊ शकतो.त्याच वजन ७० टन पर्यत असल्याने ते वजन पुलावर पेले पाहिजे.त्यानुसार बांधकाम झाली पाहिजे.अशी प्रामुख्याने अट घातली होती.हा पूल बांधत होते.त्यावेळी दोन्ही बाजूने भले मोठे खडक होते.त्यामुळे कामात काही अडचण आली नाही.आम्ही अटी आणि नियमानुसार पूल बांधला.हा पूल जवळपास १०० वर्षापर्यत टिकला असता. ब्रिटिश जर आपल्या येथील पुलांची शाश्वती १०० वर्षापर्यत देऊ शकतात.तर मी का देऊ शकत नाही.कारण त्याच ताकदीच आणि मजबुतीच काम केल्याच त्यानी सांगितलं.

हेही वाचा- पुणे : जी. ए. कुलकर्णी यांच्या कथा, गप्पा त्यांच्याच आवाजात ऐकण्याची संधी ; जन्मशताब्दी वर्षानिमित्त उपक्रम

तसेच ते पुढे म्हणाले की,चांदणी चौक आणि आसपासचा भाग ग्रामीण होता. त्यावरून आज किंवा उद्या मोठ्या प्रमाणावर वर्दळ होणार, हे निश्चित होते.तर पुलाच्या खालून हायवे जाणार होता.त्यामुळे आम्ही सर्व बाजूचा विचार करूनच बांधकाम केले होते.आज मला माझ्या कामाचे खर्‍या अर्थाने समाधानी आहे. तसेच आम्ही पुणे शहर आणि आसपास म्हणजे चांदणी चौक,पवना नदी,आळंदी येथे पूल बांधले गेले आहेत.नगर, सातारा, नाशिक येथे देखील काम केली असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा- पुणेकरांचे १०० कोटी खड्ड्यात! ; महापालिका आयुक्तांकडून रस्ते दुरुस्ती, डांबरीकरणासाठी खर्चाला मंजुरी

जास्तच स्टील वापरल्याने पूल एकाच स्फोटात पडला नसल्याचे कंपनी आणि अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. त्यावर ते म्हणाले की,दोन दिवसापूर्वी चांदणी चौकातील पूल स्फोट घडवुन पाडला.पण तो पुल एकाच स्फोटात पडला नाही.त्यावरून अनेक कारण पुढे करण्यात आली आहे. पण मला इंजिनिअरिंगच्या भाषेत जास्तीच मटेरियल हे मला काही कळत नाही.कशापेक्षा जास्त, त्यामुळे त्यांना काय म्हणायच होत.मात्र तो पूल त्यावेळी पडला नाही. यामुळे काही तरी म्हटलं पाहीजे.म्हणून त्यावेळी ते तसं म्हटले असतील.अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bridge at chandni chowk would have lasted 100 years said satish marathe pune print news
First published on: 04-10-2022 at 18:23 IST