Bridges demolished China Wall Berlin Wall Chandni Chowk bridge trending on social media pune print news ysh 95 | Loksatta

पुणे : पूल पाडताय की चीनची भिंत पासून ते बर्लिन वॉलपर्यंत…; चांदणी चौकातला पूल सोशल मिडियावर ट्रेंडिंग 

चांदणी चौकातील पूल पाडणार असल्याची घोषणा सुरु झाल्यापासून सोशल मिडियावर गप्पा झाल्या नाहीत तरच नवल.

पुणे : पूल पाडताय की चीनची भिंत पासून ते बर्लिन वॉलपर्यंत…; चांदणी चौकातला पूल सोशल मिडियावर ट्रेंडिंग 
चांदणी चौकातला पूल सोशल मिडियावर ट्रेंडिंग 

पुणे : चांदणी चौकातील पूल पाडणार असल्याची घोषणा सुरु झाल्यापासून सोशल मिडियावर गप्पा झाल्या नाहीत तरच नवल. फेसबुक, ट्वीटर आणि व्हॉट्सॲपसह सगळीकडेच शनिवारपासून पूल चर्चेत राहिला. हा पूल पाडण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनापासूनच या चर्चांना सुरुवात झाली. त्यातूनच – ‘मोजून ३० मीटरचा पूल पाडणार आहेत आणि आव असा आणलाय जणू काही चीनची भिंतच पाडायची आहे!’ हा मेसेज सोशल मिडियावर व्हायरल होण्यास सुरुवात झाली. ‘जर तेव्हाचं युद्ध पानिपतऐवजी बावधनला ठेवलं असतं तर अब्दाली चांदणी चौकातूनच घाबरुन परत गेला असता!’ असं म्हणून पुणेकरांनी चांदणी चौकातल्या वाहतूक कोंडीबाबतचा त्रागा व्यक्त केला.

हेही वाचा >>> पुणे : चांदणी चौकातील उड्डाणपूल अखेर स्फोटाने जमीनदोस्त; राडारोडा उचलण्याचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक बंदच

हेही वाचा >>> १ हजार ३५० डिटोनेटरच्या स्फोटानंतरही चांदणी चौकातील पूल पूर्णपणे का पडला नाही? अधिकारी म्हणाले, “कारण…”

पूल पुणे शहरातला असल्यामुळे – ‘पूल पाडायचा तर एवढी तयारी कशाला हवी? येता जाता पुणेकरांनी चार-दोन टोमणे मारले तरी पूल पडेल’ या टोमण्याची भर पडली. शनिवारी म्हणजे एक ऑक्टोबरला रात्री १ ते २ दरम्यान पूल पाडला जाणार होता. पुणेकर हे दृश्य डोळ्यात साठवायला गर्दी करणार हे स्वाभाविक असल्यामुळे चांदणी चौकातील रहिवाश्यांकडून – ‘आमच्या येथे चांदणी चौक पूल पडताना लाईव्ह पाहण्याची सोय करण्यात आली आहे. खिडकीतून पाहण्याचे ५०० रुपये तर गच्चीवरुन पाहण्याचे १००० रुपये. या शुल्कामध्ये – चहा-कॉफी-बाकरवडी वगैरे समाविष्ट नाही’ अशी एक तिरकस पुणेरी पाटीही पहायला मिळाली. प्रत्यक्ष पूल पाडण्यासाठी घडवून आणलेल्या स्फोटानंतरही पूल संपूर्ण न पडल्यामुळे – ‘मागच्या दिवाळीतले सादळलेले फटाके वापरले होते बहुदा!’ असा पुणेरी टोमणा मारला गेला नसता तरच नवल. ‘पूल गिरा नहीं – पूल गिरते नहीं’ ही कोटीही बरीच शेअर आणि लाईक झाली. पुणे शहर आणि पुणेकरांचा लाडका ‘पुलोत्सव’ आठवून पूल पाडण्याच्या उत्सवाचं ‘पूलोत्सव’ असं नामकरणही सोशल मिडियावर करण्यात आलं.

हेही वाचा >>> पुणे : चांदणी चौकातील उड्डाणपूल जमीनदोस्त; रस्ता खुला होण्यास उशीर, वाहनांच्या लांब रांगा

पूल पाडण्यापूर्वी चीनच्या भिंतीच्या आठवणी जागवण्यात आल्या तशा पूल पाडल्यानंतर बर्लिनच्या भिंतीच्या आठवणींनाही उजाळा देण्यात आला. ‘जर्मन नागरिकांनी बर्लिन वॉलचे तुकडे आठवण म्हणून घरी नेले तसे चांदणी चौक पुलाचे तुकडे पुणेकरांनी घरी नेले तर साफसफाई लवकर होईल आणि रस्ता मोकळा होईल’ असाही एक फॉरवर्ड चर्चेत राहिला. थोडक्यात, पूल पाडण्याचा कार्यक्रम प्रत्यक्ष चांदणी चौकात पार पडला असला तरी तो कार्यक्रम खऱ्या अर्थाने रंगला मात्र सोशल मीडियावरच!

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : श्वानावर चुकीचे उपचार केल्याचा आरोप; डॅाक्टरकडे पाच लाखांची खंडणी मागणारे अटकेत

संबंधित बातम्या

पुण्यातील बाळासाहेबांची शिवसेनेच्या पहिल्या जाहीर मेळाव्याकडे कार्यकर्त्यांची पाठ
‘तात्या कधी येता, वाट पाहतोय’; अजित पवारांचा मनसे नेते वसंत मोरेंना राष्ट्रवादीत येण्याचा प्रस्ताव
‘राज्यपाल परत जाण्याच्या तयारीत’; आमदार भरत गोगावले यांची माहिती
हिरवा कोपरा : पाणी : पुनर्भरण, पुनर्वापराचे प्रयोग
फिटनेस भत्त्याबाबत पोलिस निरुत्साही

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Maharashtra Breaking News Live : मंत्री उदय सामंत यांनी दिली जतमधील नाराज गांवाना भेट
Suresh Abdul Video : खान सरांचा जुना व्हिडीओ व्हायरल; कडक कारवाईची काँग्रेसची मागणी
हार्दिक पांड्या नव्हे, तर ‘या’ खेळाडूला मनिंदर सिंगने सुचवले रोहितचा उत्तराधिकारी, कोण आहे घ्या जाणून
‘पावनखिंड’च्या यशानंतर अजय पुरकर साकारणार तानाजी मालुसरेंची भूमिका; मराठीतील ऐतिहासिक चित्रपट ‘सुभेदार’ची चर्चा
Premium
Video: ६५ उड्डाणपूल, ६ बोगदे अन् २६ टोलनाके; नेमका कसा आहे शिंदे-फडणवीसांनी पहाणी केलेला ‘समृद्धी महामार्ग’