scorecardresearch

धक्कादायक; बलात्काराचा व्हिडीओ पतीला दाखवेल अशी धमकी देत आतेभावाचा बहिणीवर अत्याचार

घरात पती नसताना आतेभावाने बहिणीसोबत नको ते केलं!

धक्कादायक; बलात्काराचा व्हिडीओ पतीला दाखवेल अशी धमकी देत आतेभावाचा बहिणीवर अत्याचार

पुणे जिल्ह्यातील तळेगाव परिसरात आतेभावाने विवाहित बहिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. आरोपी बलात्कार करून त्याचा व्हिडिओ पतीला आणि नातेवाईकांना दाखवेल अशी धमकी देत अडीच वर्षे बलात्कार करत होता अशी माहिती तळेगाव पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी ३४ वर्षीय आते भावाविरोधात बहिणीने तक्रार दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील तळेगाव परिसरात राहणाऱ्या आते भावाने बहिणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित बहिणीचे लग्न झालेले असून ती पतीसह तळेगाव परिसरात राहते. मात्र, एकेदिवशी घरात पती नसताना आरोपी आतेभाऊ घरी आला आणि बळजबरी करत बहिणीवर बलात्कार केला. दरम्यान, त्याने मोबाईलमध्ये याचे व्हिडिओ काढला.

तो व्हिडिओ पतीला आणि इतर नातेवाईकांना दाखवेल अशी धमकी देऊन आतेभाऊ गेल्या अडीच वर्षांपासून वारंवार घरात पती नसताना बलात्कार करत असल्याचे बहिणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. जानेवारी २०१९ ते जून २०२१ च्या दरम्यान वारंवार हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी ३४ वर्षीय आते भावाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप अटक झालेली नाही. घटनेचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक धापटे या करत आहेत. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-10-2021 at 12:41 IST

संबंधित बातम्या