scorecardresearch

बंगल्यात जुगार अड्डा; गुन्हे शाखेचा छापा

कात्रज-कोंढवा रस्त्यावर एका बंगल्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकला.

(File Photo)

१२ जणांवर गुन्हा; रोकड, मोबाइल संच जप्त
कात्रज-कोंढवा रस्त्यावर एका बंगल्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी जुगार अड्ड्याचा मालकासह १२ जणां विरोधात गुन्हा दाखल केला. जुगाराचे साहित्य, ११ मोबाइल संच, रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी जुगार अड्ड्याचा मालक वैभव ताकवले (वय ३०, रा. टिळेकरनगर, कोंढवा बुद्रुक) याच्यासह वैभव सावळे, वरत्न माने, देवेंद्र मांगरोळे, पिराजी हुके, संभाजी गायकवाड, नाना निकुंबे, सुभाष धुमाळ, लक्ष्मण बेंद्रे, पंकज विश्वास, मोहन गावडे यांच्या सह एका विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील मानक बंगल्यात तळमजल्यावर जुगार अड्डा सुरू होता. याबाबतची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bungalow gambling crime branch raid crime persons cash mobile confiscated amy

ताज्या बातम्या