scorecardresearch

सिंहगड रस्ता भागात घरफोडी; पावणे पाच लाखांचा ऐवज लांबविला

याबाबत संजय पवार (वय ४२ रा. निवारा सोसायटी, वडगाव बुद्रुक) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बंद घराचे कुलूप उचकटून चोरट्यांनी एक लाख ६५ हजारांची रोकड तसेच दागिने असा चार लाख ६१ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली.
याबाबत संजय पवार (वय ४२ रा. निवारा सोसायटी, वडगाव बुद्रुक) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पवार कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी पवार यांच्या घराचे कुलुप तोडले. कपाटातील एक ६१ हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा चार लाख ६१ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. पवार कुटुंबीय गावाहून परतले तेव्हा घराचे कुलुप तुटल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी कपाटातील ऐवज लांबविल्याचे उघड झाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक शैलेजा जानकर तपास करत आहेत.

उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकजण बाहेरगावी पर्यटन तसेच देवदर्शनासाठी जातात. चोरटे बंद घराची पाहणी करून घरफोडीचे गुन्हे करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Burglary sinhagad road area stole thieves crime assistant inspector of police amy

ताज्या बातम्या