scorecardresearch

पुणे-सोलापूर महामार्गावर बसची ट्रकला धडक; पोलीस कर्मचाऱ्यासह चार जण ठार, १५ जखमी

हा अपघात सोलापूर-पुणे महामार्गावर यवत जवळील माणगाव सीएनजी पंपासमोर पहाटे सव्वापाच वाजता घडला. मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Bus collides with truck pune
पुणे-सोलापूर महामार्गावर बसची ट्रकला धडक (image – loksatta team/graphics)

पुणे : सोलापूरहून पुण्याकडे येणार्‍या भरधाव प्रवासी बसने थांबलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाले असून, १५ जण जखमी झाले आहेत. हा अपघात सोलापूर-पुणे महामार्गावर यवत जवळील माणगाव सीएनजी पंपासमोर पहाटे सव्वापाच वाजता घडला. मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पोलीस कर्मचारी नितीन दिलीप शिंदे (वय ३६) अमर मानतेश कलशेट्टी (वय २०), गणपत मलप्पा पाटील (वय ५५), आरती बिराजदार (वय २५) अशी मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत. अपघातात १५ जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

हेही वाचा – पुणे : सदोष संगणकप्रणालीमुळे म्हाडा सोडतीला मिळेना प्रतिसाद, मुदतवाढ देण्याची नामुष्की

हेही वाचा –  कसबा, चिंचवड पोटनिवडणुकांसाठी आणलेल्या २४५ मतदार यंत्रांमध्ये बिघाड, मतदान यंत्रे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे परत

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूरहून एक खासगी प्रवासी बस पुण्याकडे येत होती. सर्व प्रवासी झोपेत असताना पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास माणगावजवळील सीएनजी पंपाजवळ टायर फुटल्याने एक ट्रक रस्त्यात थांबलेला होता. बसचालकाला हा ट्रक उशीरा दिसला त्याला चुकवून पुढे जाताना चालकाचा अंदाज चुकला व बसने ट्रकला मागून जोरात धडक दिली. त्यात बसची एक बाजू पूर्णपणे फाटली आहे. या अपघातात चालकही जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 11:17 IST