पुणे : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना कोंढव्यातील सिंहगड सिटी स्कूलच्या आवारात घडली. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी संस्थेच्या संचालकांसह कर्मचाऱ्यांविरुद्ध कोंंढवा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

संतोष पांडुरंग माळवदकर (वय ४७, रा. पिसोळी ग्रामपंचायतीसमोर, कोंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या बसचालकाचे नाव आहे. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी सिंहगड सिटी स्कूलचे संचालक धनंजय तुकाराम महाडिक, संस्थेतील वाहतूक पर्यवेक्षक दौलत दत्तात्रय ढोक, विजय संपत कुंभार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत संतोष माळवदकर यांची पत्नी सुनीता (वय ४०) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संतोष माळवदकर सिंहगड सिटी स्कूलमधील विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. १८ ऑक्टोबर रोजी ते सिंहगड सिटी स्कूलच्या आवारात लावलेली बस पाणी मारुन स्वच्छ करत होते. त्यावेळी बसमधील काॅम्प्रेसरमधील वायरमधून विजेचा धक्का माळवदकर यांना बसला. विजेच्या धक्का बसल्याने माळवदकर बेशुद्ध पडले. संस्थेतील कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

Suicide student Nagpur, Suicide of 12th student,
अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Mumbai Girl Suicide
Mumbai Crime : मुंबईतल्या शाळेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या, बुटाच्या लेसने गळफास घेत आयुष्य संपवलं
Representative Image
“मी अभ्यास करू शकत नाही, हे माझ्या आवाक्याबाहेर…” कोटामध्ये IIT प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
Attempted of assassination plot iron strip railway track Atgaon Tanshet railway stations
आटगाव-तानशेत रेल्वे स्थानकांदरम्यान रूळावर लोखंडी पट्टी ठेऊन घातपाताचा प्रयत्न
police arrest two for attacking youths with koyta in bibvewadi
बिबवेवाडीत तरुणांवर कोयत्याने वार; पोलिसांकडून दोघांना अटक
iim bangalore student death
२९ वा वाढदिवस साजरा केला आणि विद्यार्थ्याचा काही तासातच झाला मृत्यू; IIM बंगळुरुमधील धक्कादायक घटना
person has died in an accident on Shiv Panvel road
नवी मुंबई: विचित्र अपघात एक ठार

हेही वाचा…सायबर चोरट्यांकडून तरुणाची २७ लाखांची फसवणूक, ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणुकीचे सत्र कायम

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सुरुवातीला आकस्मित मृत्यू अशी नोंद केली होती. माळवदकर यांची पत्नी सुनीता यांनी नुकतीच पोलिसांकडे फिर्याद दिली. सदोष वायरमधून विजेचा धक्का बसून पतीचा मृत्यू झाला. बसची देखभाल न केल्याने दुर्घटना घडली. दुर्घटनेस संस्थेतील संचालक तसेच पर्यवेक्षक जबाबदार असल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले. सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर तपास करत आहेत.

Story img Loader