महाराष्ट्र पोलीस दलातील कोकण, नांदेड, छत्रपती संभाजीनगर भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम मिळवून देण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाची ३० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अजित शहा (वय ४५), मयुरा शहा (वय ३६), संदीप दरेकर (वय ३२), साईराज परवत, जगदीश चौबे (वय ५०), सवी सैनी (वय ४३), संगीता शर्मा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यावसायिकाची आरोपींशी ओळख झाली होती.

हेही वाचा >>> पुणे : शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचाराचा प्रकार समुपदेशनात उघड

Sale of pistol by prisoner
पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
Secular Parishad in Dhule
जातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार
Rashmi Shukla
पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही चित्रीकरणाबाबत काळजी घ्या; महासंचालकांचे आदेश
mumbai mcdonald marathi news, all food and license holder foundation marathi news
मुंबई : मॅकडोनाल्डविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

महाराष्ट्र पोलीस दलातील नांदेड, कोकण, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात पोलिसांकडून बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे काम मिळवून देण्याचे आमिष आरोपींनी दाखविले होते. आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा ठेका मिळवून देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाकडून ३० लाख रुपये उकळले. त्यानंतर व्यावसायिकाला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम मिळवून दिले नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक पाठक तपास करत आहेत.