Premium

गोव्यातील ‘कॅसिनो’त हरल्याने पुण्यातील व्यावसायिकाची आत्महत्या; दोन तरुणींविरुद्ध गुन्हा

गोव्यातील कॅसिनोतील जुगारात पैसे हरल्याने पुण्यातील व्यावसायिकाने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

crime
( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

पुणे : गोव्यातील कॅसिनोतील जुगारात पैसे हरल्याने पुण्यातील व्यावसायिकाने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन तरुणींनी फसवणूक करुन जुगारात हरविल्याने आत्महत्या करत असल्याचे व्यावसायिकाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी दोन तरुणींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विकास शिवाजी टिंगरे (वय ५०, रा. धानोरी) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्पिता दास (वय ३५) आणि सुश्मिता दास (वय ३३) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विकास यांच्या मुलाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धानोरी जकात नाका येथील दुकानात विकास टिंगरे यांनी २३ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

हेही वाचा >>>पुणे: सिंहगड रस्त्यावरील सोसायटीत वाहनांची जाळपोळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास व्यावसायिक होते. ते ऑनलाइन जुगार खेळत होते. तरुणींनी त्यांना गोव्यात जुगार खेळण्यास जबरदस्तीने बोलावले. त्यांनी कॅसिनोतील जुगारात पैसे जिंकल्यावर खेळ बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तरुणींना त्यांना खेळ बंद करू दिला नाही. त्यांना पुन्हा जुगार खेळण्यास सांगिलते. जुगारात ते पैसे हरले. त्यानंतर ते पुण्यात आले. २३ मे रोजी त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात गु्न्हा दाखल झालेल्या तरुणींची नावे असून, त्यांनी फसवून मला हरविले, असे टिंगेर यांनी चिठ्ठीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक साळवी तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-06-2023 at 20:54 IST
Next Story
पुणे: गणवेशाच्या निर्णयामुळे शाळांपुढे नवा पेच… शाळेच्या पहिल्या दिवशी काय होणार?