पिंपरी : चिंचवडगावातून थेरगावाच्या दिशेने मोठ्या वाहनांना जाण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या पवना नदीवरील फुलपाखरू (बटरफ्लाय) आकारातील पुलाचे काम मुदत संपल्यानंतरही अपूर्णच आहे. २५ कोटी रुपयांच्या पुलावर ४० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. ठेकेदाराला दिलेली मुदतवाढ २६ जानेवारी रोजी संपत आहे. या मुदतीतही काम पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे नागरिकांना पुलासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

थेरगाव येथील प्रसुनधाम हौसिंग सोसायटी शेजारी १८ मीटर विकास आराखड्यातील रस्त्यावर थेरगाव-चिंचवड हा फुलपाखरू पूल बांधण्याचे काम महापालिकेने २०१७ मध्ये हाती घेतले. हा पूल थेरगाव आणि चिंचवड अशा दोन गावांना जोडणारा आहे. निविदा खर्च २५ कोटी १९ लाख रुपये अपेक्षित धरण्यात आला होता. त्यामध्ये धनेश्वर कन्स्ट्रक्शन यांनी १४ टक्के म्हणजेच २८ कोटी ७१ लाख रुपयांंची निविदा भरली. अन्य दोन ठेकेदारांपेक्षा त्यांचा दर कमी असल्याने त्यांना या पुलाचे बांधकाम देण्यात आले. पुलाची १०७ मीटर लांबी, तर १८ मीटर रुंदी आहे. या पुलासाठी नदीपात्रामध्ये कोणताही खांब टाकलेला नाही. त्यामुळे पवना नदीचा प्रवाह सुरळीत वाहू शकणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. १८ महिन्यांच्या मुदतीत पुलाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे कामाला ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

bmc debts for various major projects exceeded rs 2 lakh 32 thousand crores
महापालिकेची देणी मुदतठेवींच्या तिप्पट; २ लाख ३२ हजार कोटींचा खर्च, ३५ हजार कोटींची तरतूद
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Elphinstone Road Over Bridge
Elphinstone Bridge: मुंबईतील १२५ वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल पाडला जाणार; वाहतूक कोंडीमुळे हाल होणार?
Mumbai carnac Railway Flyover marathi news
कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाची तुळई रेल्वे मार्गावर स्थापन, पुलाच्या उर्वरित कामाना वेग येणार, पूल जूनपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट्य
dilapidated, bridge, Mumbai, traffic ,
मुंबईतील आणखी एक पूल जीर्ण, पुनर्बांधणीसाठी वाहतूक बंद
Shilpata road remain closed five days February reconstruction work Nilaje railway flyover
अत्यंत वर्दळीचा शिळफाटा रस्ता फेब्रुवारीत पाच दिवस बंद रहाणार, वाचा सविस्तर…
train cancellations on western railway due to mega block
वाणगाव ते डहाणू रोडदरम्यान ब्लॉक; पश्चिम रेल्वेवरील काही रेल्वेगाड्या रद्द
reconstruction of Bridge located between Mahim and Bandra stations successfully completed
माहीम-वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण

हेही वाचा >>> अंबालिका शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड सर्वोत्कृष्ट साखर कारखाना; ‘व्हीएसआय’चे पुरस्कार जाहीर

या कामासाठी जलसंपदा विभागाच्या नियमानुसार, पुलाच्या उंचीचे नियोजन करून मुख्य पुलाचे ‘डिझाईन’ करण्यात आले. या ‘डिझाईन’नुसार, पुलाच्या उंचीत वाढ करावी लागली. त्यामुळे मूळ कामात वाढ झाल्याने मूळ निविदा रकमेमध्ये पुलाचे काम पूर्ण करणे शक्य नसल्याचे सांगत उर्वरीत काम करण्याकरिता नवीन अंदाजपत्रक तयार केले.

हेही वाचा >>> आळंदी : योगी निरंजन नाथ यांची संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या प्रमुख विश्वस्त पदी निवड

या पुलासाठी थेरगाव बाजूकडील पोहोच रस्त्यास भिंत बांधणे, मुरूम भराव करणे, रस्त्याचे ‘सबग्रेड’चे काम, डांबरीकरण, तसेच चिंचवड बाजूकडील रस्त्याचे ‘सबग्रेड’चे काम, डांबरीकरण आणि दिशादर्शक फलक अशी कामे पूर्ण करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. ११ कोटी तीन लाख रुपयांचे काम एस.सी. कटारीया या ठेकेदाराला देण्यात आले. ऑगस्ट २०२३ मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आला. कामाची मुदत सप्टेंबर २०२४ पर्यंत होती. या मुदतीत काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे २६ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. पुलाला जोडणाऱ्या एका बाजूचे काम अपूर्ण आहे. या मुदतीतही काम पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे पुलाच्या दोन टप्प्यातील कामावर ३९ कोटी ७४ लाख रुपये खर्च होऊनही नागरिकांना पुलाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

वाहतुकीवरील ताण कमी होणार

थेरगाव आणि चिंचवडला जोडणारे दोन पूल सध्या पवना नदीवर आहेत. बिर्ला रुग्णालयाशेजारी मोठा, तर धनेश्वर मंदिराजवळ छोटा पूल आहे. हा छोटा पूल अरुंद असल्याने येथून अवजड वाहनांची वाहतूक होत नाही. नव्याने उभारण्यात येत असलेला पूल वाहतुकीसाठी फायदेशीर ठरणार आहे. या पुलाने थेरगाव येथून चिंचवड आणि तेथून पिंपरीत सहजतेने ये-जा करणे वाहनचालकांना शक्य होणार आहे.

एका गृहनिर्माण संस्थेच्या आक्षेपामुळे कामाला विलंब झाला. संस्थेचे पदाधिकारी, ठेकेदारांसोबत बैठक झाली आहे. संस्थेने कामाला होकार दिल्याने काम सुरू करण्यात आले आहे. पुलाची उंची वाढल्याने खर्च वाढल्याचे सहशहर अभियंता देवन्ना गट्टूवार यांनी सांगितले.

Story img Loader