कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी पालकमंत्री, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज(सोमवार) तातडीने शहरातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीत काय चर्चा झाली, उमेदवार निश्चित झाला का? भाजपाची काय रणनिती, कार्यपद्धती असणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. या पार्श्वभूमीवर ही बैठक संपल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीबाबत सविस्त माहिती दिली.

“मी आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. आम्ही सगळेजण हे मानणारे आहोत की, बाळासाहेबांचे महाराष्ट्रावर महाराष्ट्राच्या विकासावर, हिंदुत्वाच्या रक्षणात एक मोठं योगदान आहे. त्यामुळे त्यांना अभिवादन करतो आणि या निवडणुकीची तयारी सुरू झाली असं घोषित करतो.” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

Kolhapur A Y Patil
कोल्हापूर राष्ट्रवादीतील वाद उफाळला; हसन मुश्रीफ, के. पी. पाटील यांनी माझे राजकारण संपवण्याचे काम केले – ए. वाय. पाटील कडाडले
narendra modi uddhav thackeray (2)
मोदींनी उद्धव ठाकरेंना पुन्हा साद घातलेली? संजय राऊत म्हणाले, “दिल्लीतल्या त्या बैठकीत पंतप्रधानांनी…”
Jayant Patil on Ajit pawar letter
‘सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास होत नाही’, अजित पवारांचं म्हणणं खरं; जयंत पाटील पुढे म्हणाले…
jayant patil and ajit pawar
अर्थसंकल्पातील तरतुदींवरून जयंत पाटील आक्रमक; सत्ताधाऱ्यांना उद्देशून म्हणाले, “बाटाचा बूट…”

हेही वाचा – बाळासाहेबांच्या शेवटच्या भेटीची आठवण सांगणारा व्हिडीओ शेअर करत राज ठाकरेंची आदरांजली

पत्रकारपरिषदेत चंद्रकांत पाटील म्हणाले, “सगळ्यांनी आपली तयारी सुरू केली आहे. भाजपाचे दोन्ही परंपरागत मतदारसंघ असूनही प्रत्येकच विषय पुरेसा आधी विचार करा आणि पुरेसा खोलवर विचार करा. अशी आमची कार्यपद्धती असल्याने मतदारसंघ हक्काचे असूनही आम्ही तयारीला लागलेलो आहोत. आज ही निवडणूक केवळ कसबा मतदारसंघाची नाही, पूर्ण शहराने ती निवडणूक होऊन केली पाहिजे म्हणून शहरातील ३० पेक्षा जास्त प्रमुख नेत्यांची आज माझ्या घरी बैठक झाली. या बैठकीत सगळा सविस्तर विचार, उमेदवारांची चर्चा सोडून कारण उमेदवारांच्या विषयात आमचं नेहमीच धोरण असं असतं, की आपण सगळेजण कोरं पाकीट आहोत त्यावर जो पत्ता लिहिला जाईल त्यावर आपण जायचं असतं. त्यामुळे राज्याचे जे संसदीय बोर्ड आहे, आमच्या तीन समित्या असतात ते जे निर्णय करतील तो सगळ्यांना मान्य असतो. तोपर्यंत कमळ चिन्ह हाच उमेदवार असं मानून सगळ्यांनी कामाला सुरुवात केली आहे.”

याचबरोबर, “तीन समित्या केल्या आहेत, एक आहे राजकीय समिती ज्याच्या प्रमुख आमदार माधुरी मिसाळ प्रमुख असतील. माजी खासदार संजय काकडे, गणेश बिडकर, हेमंत रासणे, धीरज घाटे, शैलश टिळक ही सगळी मंडळी एका समितीमध्ये असणार आहेत. दुसरी समिती प्रामुख्याने संघटनात्मक आहे. आमची सगळी ताकद ही बुथ प्रमुख, बुथ समिती आहे. शक्ती केंद्रप्रमुख, शक्तीकेंद्र समिती आहे. असा सगळा आमचा संघटनात्मक ढाचा उभा करण्याचं काम आमचे शहराचे संघटनात्मक सरचिटणीस राजेश पांडे करतील. त्यास आमचे शहर सरचिटणीस राजेश येनपुरे सहायक म्हणून काम करतील. तिसरी समिती आमची वेगवेगळ्या कामांची असते, ज्याला आम्ही निवडणूक संचालन समिती असं म्हणतो. कसबा विधानसभेचे आमचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे हे त्या समितीचे प्रमुख असतील.” अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

हेही वाचा – “शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गद्दारांना…” बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करत अरविंद सावंतांचा विरोधकांवर निशाणा!

याशिवाय, “गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात ही निवडणूक चालेल. अशाप्रकारे सगळ्यांना सहभागी करून ही निवडणूक जरी आपला परंपरागत मतदारसंघ असला, तरी बहुमत कसं वाढेल. महाविकास आघाडीचं सरकार जाऊन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि भाजपा अशा दोन्ही पक्षाचं सरकार आल्यानंतर प्रचंड विकासाच्या रेंगाळत पडलेल्या योजनांना गती मिळाली. त्याचा परिणाम म्हणून अधिक फरकाने ही निवडणूक कशी जिंकात येईल, याचा प्रयत्न केला जाईल.” असंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं.