पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) पेठ क्रमांक ३० वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील कन्व्हिनिअन्स शॉ़पिंग सेंटरमधील एकूण ३१ व्यापारी गाळ्यांची ८० वर्षाकरिता भाडेपट्ट्याने ई-लिलाव पध्दतीने विक्री करण्यासाठी १४ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे: नदीपात्रातील मेट्रो मार्गिकेबाबतची याचिका ‘एनजीटी’कडून रद्द

त्यापैकी तळमजल्यावर सात व्यापारी गाळे असून त्याकरिता ८७ हजार १०० प्रति चौरस मीटर, तर पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर २४ व्यापारी गाळे असून त्याकरिता ८० हजार ४०० प्रति चौ.मी. आधारभूत दर आहेत. पेठ क्र. ३० येथील तळमजल्यावरील व्यापारी गाळ्यांचे कमीत कमी क्षेत्र १३.६० चौ.मी. असून त्याची आधारभूत किंमत ११ लाख ८४ हजार ५६० रुपये आहे. जास्तीत जास्त क्षेत्र २२.५० चौ.मी. असून त्याची आधारभूत किंमत १९ लाख ५९ हजार ७५० रुपये आहे.

हेही वाचा >>>पुणे: सहकारी संस्थांच्या निवडणुका २० डिसेंबरपर्यंत स्थगित

इच्छुक व्यक्तींनी ई-लिलाव प्रक्रियेसंबंधीची सूचना, सविस्तर अटी व शर्ती यांच्या माहितीसाठी https://eauction.gov.in व http://www.pmrda.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. ई-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याकरिता अर्जासोबत आधारभूत किंमतीच्या दहा टक्के अनामत रक्कमेचा धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) कार्यालयास सादर करायचा आहे. व्यापारी गाळे विकत घेण्याच्या या प्रक्रियेत जास्तीत जास्त व्यक्तींनी सहभागी व्हावे आणि मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी ०२२-२७६५२९३४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पीएमआरडीएच्या जमीन व मालमत्ता विभागाच्या सह आयुक्त स्नेहल बर्गे यांनी केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Calling for online application for tradesmen jobs in walhekarwadi chinchwad pune print news amy
First published on: 30-11-2022 at 20:00 IST