scorecardresearch

Premium

पुणे : सिंहगड रस्त्याला समांतर असलेल्या कॅनॉल रस्त्यावर आता एकेरी वाहतूक

सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने कॅनॉल रस्त्याचा वापर वाढला आहे. कॅनॉल रस्त्यावर रहदारी वाढल्याने कॅनॉल रस्ता प्रायोगिक तत्त्वावर एकेरी करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.

Canal road parallel to Sinhagad road
पुणे : सिंहगड रस्त्याला समांतर असलेल्या कॅनाॅल रस्त्यावर आता एकेरी वाहतूक (प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने कॅनॉल रस्त्याचा वापर वाढला आहे. कॅनॉल रस्त्यावर रहदारी वाढल्याने कॅनॉल रस्ता प्रायोगिक तत्त्वावर एकेरी करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. कॅनॉलच्या पलीकडून जाणारा जुना रस्ता, तसेच नवीन कॅनॉल रस्ता एकेरी करण्यात येणार आहे.

स्वारगेटकडून वडगाव आणि धायरीकडे जाणारी वाहने सिंहगड रस्त्यावरील गणेशमळा येथील सिग्नलपासून डावीकडे वळून जनता वसाहत कॅनॉल रस्त्याने हिंगणे परिसरातील एचडीएफसी बँकेच्या पुढील चौकात जातील. तेथून डावीकडे वळून आनंदविहार कॉलनीजवळून जाधव चौकापर्यंत एकेरी मार्गाने जाता येईल.

youth arrested from shahad for firing in kalyan
कल्याणमध्ये गोळीबार करणाऱ्या तरूणास शहाडमधून अटक; गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई 
Cell phone theft in immersion procession
विसर्जन मिरवणुकीत मोबाइल चोरट्यांचा उच्छाद…पोलिसांच्या ‘लॉस्ट अँड फाऊंड’ पोर्टलवर ‘एवढ्या’ नागरिकांनी केल्या तक्रारी
roads waterlogged traffic disrupted due to heavy rain in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये संततधार;पाणी साचल्याने रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी
pune heavy rain, rainwater accumulated on the roads in pune, pune street lights off due to rain
पावसाळापूर्व कामे केल्याचा महापालिकेचा दावा फोल; पुण्यातील रस्ते जलमय

हेही वाचा – पिंपरी चिंचवड : अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे विरोधी पक्षाचे नेते नजरकैदेत

हेही वाचा – बाळासोबत मातेसाठीही स्तनपान फायद्याचे! जाणून घ्या कारणे

स्वारगेटकडे जाण्यासाठी सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयापासूनचा नवीन कॅनॉल रस्ता एकेरी करण्यात येणार आहे. या रस्त्याने विश्रांतीनगरपर्यंत जाता येईल. या दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या लंडन पुलावर चारचाकी वाहनांना तसेच दोन्ही कॅनॉल रस्त्यावर जड वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे. याबाबत नागरिकांच्या काही सूचना किंवा हरकती असल्यास २० ऑगस्टपर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Canal road parallel to sinhagad road is now one way traffic pune print news rbk 25 ssb

First published on: 06-08-2023 at 12:25 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×