पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाच्या रानडे इन्स्टिट्यूटमधील अभ्यासक्रमाचे स्थलांतर कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रानडे इन्स्टिट्यूटला भेट देऊन विद्यापीठाचे कु लगुरू डॉ. नितीन करमळकर आणि पदाधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

विद्यापीठाने प्रशाला प्रणालीसाठीच्या बदलांचा भाग म्हणून रानडे इन्स्टिट्यूटमध्ये चालणाऱ्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे विद्यापीठात स्थलांतर करण्याचा, तसेच संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाचे विद्यापीठातील संज्ञापन आणि माध्यम अभ्यास विभागात विलीनीकरण करून संज्ञापन, पत्रकारिता आणि माध्यम अभ्यास विभाग हा नवा विभाग निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाला माजी विद्यार्थी, विविध संघटना आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाने विरोध के ला.

या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी शनिवारी रानडे इन्स्टिट्यूटला भेट देऊन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र कु लगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कु लसचिव डॉ. प्रफु ल्ल पवार, विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे, माजी विद्यार्थी, संघटनांचे प्रतिनिधी, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर यांच्याशी चर्चा के ली. त्यानंतर विभागाचे स्थलांतर आणि विलीनीकरण कायमस्वरुपी रद्द करण्याच्या निर्णयाचे परिपत्रक कु लसचिवांनी प्रसिद्ध केले.