scorecardresearch

Premium

आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया रद्द; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती 

आरोग्य विभागातर्फे गट क आणि गट ड या संवर्गांसाठी ऑक्टोबर २०२१मध्ये घेण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी जाहीर केले.

Rajesh Tope
(संग्रहीत छायाचित्र)

पुणे : आरोग्य विभागातर्फे गट क आणि गट ड या संवर्गांसाठी ऑक्टोबर २०२१मध्ये घेण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी जाहीर केले. आता नव्याने भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, परीक्षा दिलेल्या उमेदवारांना नव्याने राबवल्या जाणाऱ्या प्रक्रियेत पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

आरोग्य विभागातर्फे खासगी कंपनीच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र या प्रक्रियेतील परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार एमपीएससी समन्वय समितीने पुणे सायबर पोलिसांकडे दाखल केली. पोलिसांनी केलेल्या तपासात गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले. तसेच या तपासादरम्यान टीईटी परीक्षेतील घोटाळाही समोर आला. या दोन्ही परीक्षांतील गैरप्रकारासंदर्भात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ही आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Sassoon hospital
पुणे : ससूनमधील सत्य अखेर बाहेर येणार? त्रिसदस्यीय समितीच्या अहवालाकडे लक्ष
Baramati Agro Industrial Project
बारामती ॲग्रो औद्योगिक प्रकल्प बंद करण्याचे प्रकरण : रोहित पवार यांना मिळालेला अंतरिम दिलासा १३ ऑक्टबरपर्यंत कायम
epfo Higher Pension
Money Mantra : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, उच्च पेन्शन पर्याय निवडण्याची मुदत पुन्हा वाढवली
Bhik Mango agitation obc nagpur
“मी वित्तमंत्री… ओबीसींचे वसतिगृह, शिष्यवृत्तीसाठी मला भीक द्या”, ओबीसींचे अनोखे आंदोलन

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत २४ ऑक्टोबर आणि ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या गट क आणि गट ड संवर्गाच्या पदभरती परीक्षा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. या परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराचा पोलीस तपास  सुरू असून या प्रक्रियेस लागणारा वेळ लक्षात घेऊन या दोन्ही संवर्गातील परीक्षा रद्द करून नव्याने घेण्यात येणार आहे. झालेल्या निर्णयानुसार परीक्षा दिलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्यांना नवीन परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. नव्याने अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क आणि इतर नियम अटी लागू राहणार असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले. 

आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया रद्द करण्यासाठी सरकारने टाळाटाळ केली. अखेर ही प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. आमच्या लढ्याला यश आले.

– नीलेश गायकवाड, एमपीएससी समन्वय समिती

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cancellation recruitment process health department information health minister rajesh tope ysh

First published on: 29-06-2022 at 23:28 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×