पुणे : आरोग्य विभागातर्फे गट क आणि गट ड या संवर्गांसाठी ऑक्टोबर २०२१मध्ये घेण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी जाहीर केले. आता नव्याने भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, परीक्षा दिलेल्या उमेदवारांना नव्याने राबवल्या जाणाऱ्या प्रक्रियेत पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोग्य विभागातर्फे खासगी कंपनीच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र या प्रक्रियेतील परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार एमपीएससी समन्वय समितीने पुणे सायबर पोलिसांकडे दाखल केली. पोलिसांनी केलेल्या तपासात गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले. तसेच या तपासादरम्यान टीईटी परीक्षेतील घोटाळाही समोर आला. या दोन्ही परीक्षांतील गैरप्रकारासंदर्भात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ही आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cancellation recruitment process health department information health minister rajesh tope ysh
First published on: 29-06-2022 at 23:28 IST