scorecardresearch

अचानक घेतलेलं वळण दोघांच्या जीवावर बेतलं; पुणे-सोलापूर मार्गावर भीषण अपघात

रस्त्याच्याकडेने पायी जात असल्याऱ्या व्यक्तीला देखील जोरात धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला

car accident pune
रात्री तीनच्या सुमारास झाला हा अपघात

पुणे सोलापूर महामार्गावर दोन चार चाकी वाहनांमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

मरण पावलेल्या व्यक्तींपैकी एकाची ओळख अद्याप पटलेली नाही. तर मृतांपैकी अन्य एका व्यक्तीचं नाव श्रणिक प्रभाकर होले असं असल्याची माहिती समोर आलीय. श्रणिक हा २७ वर्षांचा होता. संकेत बाळासाहेब भंडलकर (वय २१), सुनिल निळाराम शितकल (वय २२),अनिल बाळासाहेब जाधव (वय २२) अशी जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील मयत श्रणिक पुण्याकडून यवतला मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास चार चाकी वाहनातून जात होता. श्रणिक मांजरी येथील द्राक्ष बागेच्याजवळ येताच, सोलापूरच्या बाजूने येणार्‍या चार चाकी वाहनांने दुभाजकापासून अचानक वळण घेतले. दोन्ही वाहनाची समोरासमोर जोरात धडक बसली. त्यानंतर श्रणिक होले यांची गाडी रस्त्याच्या बाजूला पलटी झाली, तर त्याचदरम्यान रस्त्याच्याकडेने पायी जात असणाऱ्या व्यक्तीला श्रणिक यांच्या गाडीने जोरात धडक दिली. यामध्ये त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून त्या व्यक्तिचे नाव समजू शकलेले नाही. तसेच दुसर्‍या चार चाकी वाहनातील तिघे जण गंभीर जखमी असल्याचे हडपसर पोलिसांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Car accident 2 died svk 88 scsg