scorecardresearch

पुण्यात भरधाव कारची हातगाड्यांना धडक, दोन जण जखमी

महिलेचे कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.

loksatta
दोघे जण किरकोळ जखमी तर दोन हातगाड्यांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज दुपारी दोनच्या सुमारास फरासखाना पोलीस ठाण्यासमोर घडली.

महिलेने भरधाव कार चालवत दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याची घटना ताजी असतानाच आज (शनिवार) पुन्हा एकदा असाच प्रकार पुण्यात पाहायला मिळाला. पण सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. दोघे जण किरकोळ जखमी तर दोन हातगाड्यांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज दुपारी दोनच्या सुमारास फरासखाना पोलीस ठाण्यासमोर घडली.

अधिक माहिती अशी, आज दुपारी दोनच्या एक महिला अप्पा बळवंत चौकाकडून बुधवार चौकाकडे भरधाव वेगात कार (एमएच १४ एफएस ५७७४) घेऊन जात होती. फरासखाना पोलीस ठाण्याजवळ आल्यानंतर त्या महिलेचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दोन हातगाड्यांवर जाऊन धडकली. यात दोघे किरकोळ जखमी झाले. यात दोन्ही हातगाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती फरासखाना पोलिसांनी दिली. पोलिसांनी कार चालवणाऱ्या महिलेस ताब्यात घेतले आहे. घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-05-2017 at 16:02 IST