पानशेत धरणात कार बुडून पत्नीचा मृत्यू; तर पती आणि मुलास वाचविण्यात यश

पुण्यातील पानशेत धरणाजवळून जात असताना अपघातात झाला.

Drowned-death
(प्रातिनिधीक फोटो)

पुण्यातील पानशेत धरणाजवळून जात असताना अपघातात झाला. पुण्यातील शनिवार पेठेत राहणारे देशपांडे कुटुंबातील पती, पत्नी आणि त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा हे तिघे जण पानशेत धरणा जवळून पुण्याच्या दिशेने येत होते. यावेळी त्यांच्या कारचा टायर फुटण्याची घटना घडली. या घटनेत कार धरण क्षेत्रात जाऊन पडली. यामध्ये पत्नीचा बुडून मृत्यू झाला. तर पती आणि मुलाला वाचविण्यात यश आले आहे. ३३ वर्षीय समृद्धी देशपांडे यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर पती योगेश देशपांडे  आणि नऊ वर्षाचा मुलगा हे दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे.

वेल्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार पेठेत राहणारे योगेश देशपांडे हे पत्नी समृद्धी आणि मुलासोबत सकाळी पानशेतच्या दिशेने कारने फिरण्यास गेले होते. तेथून दुपारच्या सुमारास पुण्याच्या दिशेने येत होते. त्या दरम्यान कारचा टायर फुटला आणि कार पानशेत धरणात जाऊन पडली. ही घटना रस्त्याच्या बाजूला असलेल्या नागरिकांनी पाहताच, गाडीतून मुलाला आणि पती योगेश यांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र समृद्धी यांना बाहेर काढताना, अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कारची काच फोडून त्यांना बाहेर काढावे लागले. त्यानंतर तात्काळ समृद्धी यांना रुग्णालयात दाखल केल्यावर, डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता. समृद्धी यांना मृत घोषित केल्याचे सांगण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Car sank in the panshet dam wife drowned rmt 84 svk88

Next Story
राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदासाठी काकडे, निकम, पाटील यांची चर्चा