लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महापालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धंगेकर यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

thane, Jitendra Awhad, mumbai High Court, quash the FIR
गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात
Rana Kapoor gets bail in latest case will be out of jail after four years
राणा कपूर यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन, चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार
arvind kejriwal
‘आप’चे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न; केजरीवाल यांच्या सुटकेच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान वकिलाचा दावा
aam aadmi party AAP
आपचे खासदार संजय सिंह यांना मिळालेल्या जामिनाचे कारण काय? त्यांच्या वकिलांकडून नेमका काय युक्तिवाद करण्यात आला?

प्रजासत्ताक दिनानिमित्त गोखलेनगर भागात आशानगर परिसरात महापालिकेकडून बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यात आले होते. काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट पाण्याची टाकी बांधण्यासाठी पाठपुरावा केला होता. टाकीच्या उद्घाटनाचे श्रेय भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी घेतल्याचा आरोप करून धंगेकर यांच्यासह कार्यकर्ते तेथे जमले होते.

आणखी वाचा-पुणे : सहायक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ यांचे निधन

धंगेकर यांनी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी शिवीगाळ करून धमकावले होते. या घटनेची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाली होती. धंगेकर यांनी महापालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी निषेध केला होता. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी धंगेकर यांच्यावर टीका केली होती. जगताप यांनी फिर्याद दिल्यानंतर सोमवारी रात्री धंगेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, ससून रूग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनील कांबळे यांनी नाराजी व्यक्त केली होती. या कार्यक्रमात कांबळे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यातील एका पोलीस शिपायाला कानाखाली मारली होती. त्यानंतर कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आणखी वाचा-अमेरिकेत मराठी शिक्षणाऱ्या मुलांना बालभारतीकडून पाठ्यपुस्तके;शिक्षण विभागाचा निर्णय 

धंगेकरांविरुद्ध दुसरा गुन्हा

नदीतील जलपर्णी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप धंगेकर यांनी केला होता. त्यावेळी धंगेकर यांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना चप्पल फेकून मारली होती. याप्रकरणी धंगेकरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.