scorecardresearch

पुणे : कंपनीच्या मालाची परस्पर विक्री करून व्यवस्थापकाने घातला ७२ लाखांचा गंडा

कंपनीतील व्यवस्थापकानेच मालाची परस्पर विक्री करून पैशांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याने दोन वर्षांत तब्बल ७२ लाख रुपयांचा अपहार केला आहे.

manager made 72 lakhs selling goods
पुणे : कंपनीच्या मालाची परस्पर विक्री करून व्यवस्थापकाने घातला ७२ लाखांचा गंडा (image – indian express)

पुणे : नामांकित कंपनीतील व्यवस्थापकानेच मालाची परस्पर विक्री करून पैशांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याने दोन वर्षांत तब्बल ७२ लाख रुपयांचा अपहार केला आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात सुजीत चौधरी (वय ३९) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अमोल शिवाजी वाघ (रा. रांजणगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०२० ते मे २०२२ या कालावधीत घडला आहे.

हेही वाचा – पुणे महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन पथकाला थकबाकीदाराकडून शिवीगाळ..!

हेही वाचा – अकाउंट व्हेरिफिकेशनच्या बहाण्याने ७८ हजार रुपयांचा गंडा

वाकडेवाडी परिसरात हेला इन्फ्रा मार्केट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत तक्रारदार हे वरिष्ठ व्यवस्थापक आहेत. तर, अमोल वाघ हा व्यवसाय विकास व्यवस्थापक (बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर) या पदावर नोकरी करत होता. दरम्यान, कंपनीकडून वेगवेगळ्या विक्रेत्यांना माल पुरविला जातो. त्याचे काम अमोल पाहत होता. त्याने परस्परच काही मालाची वेळोवेळी विक्री करून त्याचे पैसे कंपनीत न भरता अपहार केला. हा प्रकार समोर आल्यानंतर त्याची पाहणी केली असता त्याने जवळपास ७२ लाख ८४ हजार रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले. त्यानंतर याप्रकरणी तक्रार देण्यात आली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 17:07 IST
ताज्या बातम्या