राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. केतकीने फेसबुकवर पोस्ट केलेल्या त्या कवितेत संत तुका म्हणे हा शब्द वापरण्यात आला असून त्याला आता देहू संस्थानने विरोध दर्शविला आहे. वारकऱ्यांच्या भावना दुखावल्याने यासंबंधी केतवीवर गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबत देहूरोड पोलिसात पत्र दिलं होत. त्यानुसार केतकीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुका म्हणे ही संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगाची स्वाक्षरी आहे. अस पोलिसांना देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं होत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या तुका म्हणे शब्दांचा वापर करून वादग्रस्त लिखाण केलेल्या केतकी चितळेवर गुन्हा दाखल करण्यात यावा अस पत्र देहू संस्थाने पिंपरी-चिंचवड पोलिसांना दिलं होतं. त्यानुसार केतकीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केतकीने तुका म्हणे शब्दांचा वापर करून विटंबना, वादग्रस्त लिखाण केले आहे. यामुळं वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे. तुका म्हणे ही संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगाची स्वाक्षरी आहे. त्यामुळं तुकोबाच नव्हे तर देशातील इतर संतांच्या नावाचा वापर करू नये. अस लेखन करत असेल तर त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे देहू संस्थांकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.  

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case filed against ketki chitale after demand of dehu sansthan abn 97 kjp
First published on: 16-05-2022 at 11:40 IST