भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबापेठ मतदारसंघाच्या जागेसाठी काल पोटनिवडणूक पार पडली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांनी मतदान करताना आचारसंहितेचा भंग केला आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – Kasba Bypoll Election Result 2023: “लोकांनी पैसे घेतले पण मत ह्रदयातल्या धंगेकरांना दिलं”, रवींद्र धंगेकरांचं मोठं विधान; गैरव्यवहाराच्या चर्चांना उधाण!

caa in assam,
सीएए विरोधात आसाममधील विरोधीपक्ष आक्रमक, मुख्यमंत्री सरमांनीही दिलं प्रत्युत्तर; पुन्हा आंदोलन पेटणार?
rahul gandhi wayanad election
सीपीआयने उमेदवार दिल्यानंतरही काँग्रेसला वायनाडमधून राहुल गांधीच का हवेत?
Shahjahan Sheikh arrest
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेखला ५४ दिवसांनी अटक
himachal pradesh political crisis
हिमाचलमधील सरकार वाचविण्याचे प्रयत्न; काँग्रेस निरीक्षक राज्यात दाखल; नाराज आमदारांशी चर्चा

कसबापेठ मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांनी काल नूतन मराठी विद्यालयातील बुध क्रमांक ७५ जाऊन मतदान केले होते. मात्र, यावेळी त्यांनी गळ्यात कमळाचे चिन्ह असलेला उपरणं घातलं होते. याप्रकरणी विरोधकांनी आक्षेप घेत रासने आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारही दाखल करण्यात आली होती. दरम्यान, याप्रकरणी आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून हेमंत रासनेंविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता निवडणूक आयोग रासनेंविरोधात नेमकी या कारवाई करते, हे बघणं महत्त्वाचं आहे.