VIDEO: पुण्यात म्हशीने दुचाकीस्वाराला उडलं, मालकाविरोधात गुन्हा दाखल; तिघांना अटक

धडकेत दुचाकीस्वारासह त्याच्या मागे बसलेली महिला जखमी

Pune, Camp Area,
धडकेत दुचाकीस्वारासह त्याच्या मागे बसलेली महिला जखमी झाली.

पुण्यातील कॅम्प परिसरात म्हशीने दुचाकीस्वाराला धडक दिल्याची घटना आहे. कॅम्प परिसरात घडलेली ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रस्त्यावरुन जात असताना अचानक धावत गेलेल्या म्हशीने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे त्याच्यासोबत बाजूला असणारा दुचाकीस्वारदेखील खाली कोसळला. दरम्यान याप्रकरणी पोलीस ठाण्यात म्हशीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

मोहम्मद स्ट्रीट रस्त्यावरून पाच-सहा म्हशी जात होत्या. त्यावेळी त्यांच्यापैकी एका म्हशीने रस्त्यावरून जाणार्‍या दुचाकी चालकाला जोरात धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वारासह त्याच्या मागे बसलेली महिला जखमी झाली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर म्हशीच्या मालकाविरोधात लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Case registered against buffalo owner in pune svk 88 sgy

Next Story
उसने पैसे वेळेत न दिल्यामुळे अंगावर अ‍ॅसिड टाकले
ताज्या बातम्या