मंदीर उघडण्याच्या आंदोलना प्रकरणी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह कार्यकर्त्यां विरोधात गुन्हा दाखल

राज्यभरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून प्रत्येक मंदिरा समोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

पुण्यात मंदीर उघडण्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलना प्रकरणी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह 30 ते 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

राज्यातील मंदिरे उघडण्यात यावी, या मागणीसाठी पुण्यातील कसबा गणपती समोर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी आंदोलन केले.त्यावेळी करोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यासह ३० ते ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यातील मंदिर उघडण्यात यावेत, या मागणीसाठी सोमवारी राज्यभरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून प्रत्येक मंदिरा समोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. असेच आंदोलन सोमवारी कसबा गणपती समोर भाजपचे प्रदेशाध्यक्ष कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.त्या आंदोलनाला महापौर मुरलीधर मोहोळ, शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी बहुतांश कार्यकर्त्यांनी मास्क घातले नव्हते.तर कार्यकर्त्यांनी करोना नियमांचे कोणत्याही प्रकारचे पालन केले नव्हते. त्या आंदोलनानंतर चंद्रकांत पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी कसबा गणपती मंदिरात प्रवेश करून आरती देखील केली. त्या पार्श्वभूमीवर करोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यासह ३० ते ४० जणां विरोधात फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Case registered against maharashtra bjp chief chandrakant patil and 30 to 40 workers for violating covid guidelines zws