पुणे : कर्मचाऱ्यांचा वेतनातून भविष्य निर्वाह निधी कपात करुन ७० लाख ९२ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत राहुल एकनाथ कोकाटे (वय ५१, रा. क्रिमसन क्रिस्ट सोसायटी, तुपेनगर, हडपसर) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती निवृत्ती नवले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील टिळेकरनगर परिसरात सिंहगड सिटी स्कूल आहे. या शाळेतील ११५ कर्मचाऱ्यांच्या वेतनातून भविष्यनिर्वाह निधी कपात करण्यात आला. ऑक्टोबर २०१९ ते जून २०२२ या कालावधीत कर्मचाऱ्यांच्या वेतनानतून एकूण मिळून ७४ लाख ६८ हजार ६२६ रुपये कपात करण्यात आले. त्यापैकी तीन लाख ७५ हजार ७७४ रुपये भविष्य निर्वाह कार्यालयात जमा करण्यात आले. उर्वरित ७० लाख ९२ हजार ८६२ रुपयांचा अपहार करण्यात आला.

Ajit pawar reaction on cid and sit Inquiry in valmik karad case
वाल्मिक कराड प्रकरण: CID आणि SIT कुणाच्या दबावाखाली? अजित पवार स्पष्टच बोलले…
Mephedrone worth 15 lakhs seized from Mahatma Gandhi Road area two arrested
महात्मा गांधी रस्ता परिसरातून १५ लाखांचे मेफेड्रोन जप्त,…
School Education Minister is on a visit to Pune today. In the morning I paid a surprise visit to the municipal school in Pimpri-Chinchwad.
शालेय मंत्र्यांची पिंपरी- चिंचवड मधील शाळेला अचानक भेट; शिक्षकांची उडाली धांदल!
criminal gang, Saif Ali Khan , Yogesh Kadam,
सैफ अली खान हल्ला प्रकरणात गुन्हेगारी टोळीचा हात नाही – गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती
Life imprisonment , mother murder daughter ,
कौटुंबिक वादातून पोटच्या मुलीचा खून करणाऱ्या आईला जन्मठेप
Narayangaon Pune Accident 9 people died
Narayangaon Pune Accident : पुण्यातील नारायणगाव येथे ट्रकने कारला उडवले, ९ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना मदत जाहीर
pune Metro , Metro Space pune Metro Space Huts pune
पुणे : मेट्रोच्या जागेतील ५० झोपड्या महापालिकेने का हटवल्या ?
Disciplinary action , Pune municipal corporation,
पुणे : राडारोडा टाकणाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास अधिकाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई !
Pune Roads, Drainage Chamber, Road Pits,
पुणे : रस्त्यांवरील ड्रेनेज चेंबरची झाकणे पुन्हा ‘खड्ड्यात’ !

हेही वाचा… धक्कादायक! ४० रेल्वे प्रवाशांना अन्नातून विषबाधा; भारत गौरव यात्रेतील प्रकार

हेही वाचा… राष्ट्रपती तीन दिवस पुणे दौऱ्यावर

नवले यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम भविष्य निर्वाह निधीत जमा न करता अपहार केल्याचे कोकाटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. नवले यांच्याविरुद्ध कोकाटे यांनी न्यायालयात खासगी फौजदारी दावा दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशाने नवले यांच्याविरुद्ध अपहार केल्याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक बाबर तपास करत आहेत.

Story img Loader