scorecardresearch

Premium

भाजप नेते आमदार नितेश राणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, पुण्यात तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीचे आंदोलन

ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतेवेळी भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी ‘हिजडा’ या शब्दाचा वापर केला.

protest of transgender rights struggle committee
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या राज्य समन्वयक शामिभा पाटील यांनी आंदोलन केले.(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

पुणे: ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतेवेळी भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी ‘हिजडा’ या शब्दाचा वापर केला. त्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. या मागणीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालया जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या राज्य समन्वयक शामिभा पाटील यांनी आंदोलन केले.

त्यावेळी शामिभा पाटील यांच्यासोबत असलेल्या अन्य सहकार्‍यांना बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर या घटनेची माहिती ठाकरे गटाच्या उपनेत्या प्रवक्त्या सुषमा अंधारे, वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर, अॅड. असीम सरोदे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट घेऊन पोलिसा सोबत चर्चा केली. नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी केली.

Chandrakant Patil should resign as minister sakal Maratha community demand in Kolhapur
चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; कोल्हापुरात सकल मराठा समाजाची मागणी
Nitish Kumar New cm of bihar
नवव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी जिथं होतो…”
Vinod Tawde Nitish Kumar
राजकीय गदारोळात विनोद तावडे बिहारमध्ये दाखल, भाजपा नितीश कुमारांना समर्थन देणार?
Himanta Biswa Sarma has directed criminal case be filed against Congress leader Rahul Gandhi
गुवाहाटीत काँग्रेस कार्यकर्ते अन् पोलिसांमध्ये झटापट; मुख्यमंत्र्याकडून राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

आणखी वाचा-पिंपरी: ‘दादा’ मंत्र्यांचा तोंडी आदेश; अतिरिक्त आयुक्त पदभारापासून वंचित

यावेळी तृतीपंथी हक्क समितीच्या राज्य समन्वयक शामिभा पाटील म्हणाल्या की, आमच्या हक्कासाठी आम्ही लढा देत असून आम्हाला न्याय मिळावा यासाठी कोणताही लोकप्रतिनिधी पुढे येत नाही. पण त्याच दरम्यान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतेवेळी हिजडा या शब्दाचा वापर केला आहे. त्या विधानाच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी बंड गार्डन पोलिसा कडे मागणी केली. आमच्या मागण्याची दखल घेतली नाही. त्यामुळे आम्ही आंदोलन केले. तर पोलिसांनी अमानुष पद्धतीने वागणूक दिली आहे. त्या गोष्टीचा निषेध व्यक्त करीत असून जोवर नितेश राणे विरोधात गुन्हा दाखल होत नाही आणि कारवाई होत नाही. तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Case should be filed against bjp leader mla nitesh rane protest of transgender rights struggle committee in pune svk 88 mrj

First published on: 12-07-2023 at 13:53 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

×