कामावरून काढून टाकल्याच्या रागातून हॉटेल कामगाराने सहकारी कामगारांना धमकावून गल्ल्यातील ६६ हजारांची रोकड लुटल्याची घटना कोंढवा भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे.
सूरज सकट (वय ३२, रा. म्हाडा कॉलनी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत सचिन यादव (वय ४५, रा. उंड्री) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यादव यांचे पिसोळी रस्त्यावर इम्प्रेस बार अँड रेस्टॉरंट हॉटेल आहे. सकट यादव यांच्या हॉटेलमध्ये काम करत होता. सकटची वर्तणूक चांगली नसल्याने त्याला यादव यांनी कामावरुन काढून टाकले होते.
त्यानंतर सकट दुपारी हॉटेल बंद करण्याच्या वेळेस हॉटेलमध्ये शिरला. त्या वेळी यादव नव्हते. हॉटेलमधील कामगारांना त्याने धमकावले. गल्ल्यातील ६६ हजार ६०० रुपयांची रोकड लूटून सकट पसार झाला. सकटला पोलिसांनी अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cash looted from hotel alley after being fired workers arrested print news amy
First published on: 18-05-2022 at 17:40 IST