पिंपरी : मावळ तालुक्यातील सोमाटणे येथे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या माजी उपसरपंचाच्या कार्यालयावर छापा टाकून तळेगाव दाभाडे पोलिसांनी ३७ लाख रुपयांची रोकड जप्त केल्याचा प्रकार ताजा असतानाच देहूरोड पोलिसांनी देहुगावात मंगळवारी (१२ नोव्हेंबर) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास पुन्हा राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून सव्वातीन लाखाची रोकड जप्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष विवेक वसंत काळोखे (वय ४४, रा. काळोखे मळा, देहूगाव) यांच्यासह सागर निवृत्ती भसे (वय ३९, रा. भीमाशंकर सोसायटी, देहूगाव) यांच्याकडून रोकड जप्त केली आहे.

देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार,  देहुगावातील चव्हाणनगर येथे दोन जण मोटारीत पैसे घेऊन मतदारांना वाटण्यासाठी आले आहेत, अशी माहिती  पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मोटारीत भसे आणि  काळोखे हे दोघे जण होते. पोलिसांनी मोटारीची तपासणी केली असता चालकाच्या आसनाच्या बाजूच्या आसनाखालील एका पिशवीमध्ये तीन लाख २० हजार रूपयांची रोकड आढळून आली. या रकमेबाबत काळोखे व बसे यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी समर्पक उत्तरे दिली नाहीत. ही रक्कम कोठून आणली याबाबत काही कागदपत्रे उपलब्ध नसल्याने रोकड दोन पंचांसमक्ष जप्त करण्यात आली. पुढील कारवाईकरिता ही रोकड निवडणूक विभागाच्या भरारी पथकाच्या ताब्यात देण्यात आली आहे.

Baramati protests that Pratibha Pawar was prevented from campaigning Inspection of Sharad Pawar bag Pune news
प्रतिभा पवार यांंना प्रचारापासून रोखल्याचे बारामतीत पडसाद; शरद पवार यांच्या बॅगची तपासणी
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Demand money from company owner in name of MLA Pune news
आमदाराच्या नावाने कंपनी मालकाकडे पैशांची मागणी
Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
During the speech of Devendra Fadnavis the chairs started emptying nashik news
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या होण्यास सुरुवात