scorecardresearch

पुणे : ‘कसब्या’त दिवाळी; फटाक्यांचा धूर , रवींद्र धंगेकरांच्या विजयानंतर चौकाचौकात आतषबाजी

धंगेकर विजयी झाल्याचे समजाताच कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला.

पुणे : ‘कसब्या’त दिवाळी; फटाक्यांचा धूर , रवींद्र धंगेकरांच्या विजयानंतर चौकाचौकात आतषबाजी
वींद्र धंगेकरांच्या विजयानंतर चौकाचौकात आतषबाजी

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाल्यानंतर कसबा मतदारसंघातील चौकाचौकात आतषबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या माळा लावून धंगेकर यांचा विजय साजरा केला. कसबा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांच्यातील चुरशीच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मतमोजणी सुरू झाल्यानंतर सकाळी अकरानंतर निकालाचा कल स्पष्ट झाला. धंगेकर विजयी झाल्याचे समजाताच कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. कसबा पेठ, बुधवार पेठ, रविवार पेठ, गणेश पेठ, शुक्रवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठेतील कार्यकर्त्यांनी चौकाचाैकात फटाक्याच्या माळा लावल्या.

हेही वाचा >>> Kasba By Poll 2023 : “भाजपाने पैशांचा धूर काढला पण शिंदे सरकार आणि तेच जळून..” रवींद्र धंगेकर यांची विजयानंतर टीका

कार्यकर्त्यांनी पेढे भरवून अभिनंदन केले. चौकाचौकात लावण्यात आलेल्या ध्वनीवर्धक लावण्यात आले हाेते. दिवाळीत फटाक्यांना मागणी असते. पोटनिवडणुकीत धंगेकर विजयाच्या जवळ येऊन पोहोचल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी फटाके खरेदी केली. फटाक्यांच्या माळांना मागणी जास्त होती. दिवाळीनंतर पहिल्यांदाच फटाक्यांना मागणी राहिली. कार्यकर्त्यांनी प्रत्येक चौकात आतषबाजी केली. सायंकाळपर्यंत फटाक्यांच्या माळांना मागणी होती, असे अभिजीत फटाका मार्टचे अभिजीत गोरिवले यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 19:01 IST
ताज्या बातम्या