पिंपरी- चिंचवड: अजित पवार पालकमंत्री होताच बालेकिल्यात फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष

पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांचे नाव पुढे आलं यानंतर पिंपरी चिंचवड मध्ये कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष बघायला मिळाला.

celebration in pimpri chinchwad after ajit pawar become guardian minister
यानंतर पिंपरी चिंचवड मध्ये कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा होती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा पालकमंत्री पद मिळाल्यानंतर बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाकडून फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. एकच वादा अजितदादा, अजित दादा तुम आगे बढो अशा प्रकारच्या घोषणा देऊन कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त.

हेही वाचा >>> पुणे जिल्ह्यात अजित पवारच ‘दादा’; पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत चंद्रकांत पाटलांना ठरले वरचढ

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा होती. तसेच अजित पवार राष्ट्रवादीचा आमदारांचा एक गट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील भेटला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर आज पालकमंत्रीपदांचं वाटप करण्यात आलं. पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांचे नाव पुढे आलं यानंतर पिंपरी चिंचवड मध्ये कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष बघायला मिळाला. फटाके फोडून आणि पेढे वाटून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पिंपरी-चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. अजित पवार यांना पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर पिंपरी- चिंचवड शहरात कार्यकर्त्यांची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Celebration in pimpri chinchwad after ajit pawar become guardian minister of pune kjp 91 zws

First published on: 04-10-2023 at 16:34 IST
Next Story
पुणे जिल्ह्यात अजित पवारच ‘दादा’; पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत चंद्रकांत पाटलांना ठरले वरचढ