Premium

विसर्जन मिरवणुकीत मोबाइल चोरट्यांचा उच्छाद…पोलिसांच्या ‘लॉस्ट अँड फाऊंड’ पोर्टलवर ‘एवढ्या’ नागरिकांनी केल्या तक्रारी

लक्ष्मी रस्त्यासह टिळक रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता या विसर्जन मार्गावर गुरुवारी रात्री झालेल्या गर्दीत चोरट्यांनी मोबाइल चोरल्याच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या.

Cell phone theft in immersion procession
नागरिकांचे मोबाइल चोरणाऱ्या झारखंडमधील चोरट्यांना पोलिसांनी पकडले. (फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : विसर्जन मिरवणुकीत अनेकांचे मोबाइल संच चोरीला गेले. लक्ष्मी रस्त्यासह टिळक रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता या विसर्जन मार्गावर गुरुवारी रात्री झालेल्या गर्दीत चोरट्यांनी मोबाइल चोरल्याच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या.

गणेशोत्सवात भाविकांच्या खिशातील रोकड, तसेच महिलांच्या गळ्यातील दागिने चोरण्याच्या घटना दरवर्षी घडतात. पुण्यातील विसर्जन सोहळा भाविकांचे आकर्षण आहे. गुरुवारी (२८ सप्टेंबर) मध्यरात्री लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता परिसरात विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांचे मोबाइल संच चोरट्यांनी चोरले.

आणखी वाचा-मायलेकाचा सेल्फी ठरला अखेरचा, काही वेळातच विसर्जनादरम्यान चार वर्षांच्या चिमुकल्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू!

यंदा गणेशोत्सवात मोबाइल चोरीला गेल्याच्या एक हजारहून जास्त तक्रारी पुणे पोलिसांच्या ‘लॉस्ट अँड फाऊंड’ या ऑनलाइन पोर्टलवर करण्यात आल्या आहेत. विश्रामबाग, खडक, फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोबाइल चोरीला गेल्याच्या सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्या. नागरिकांचे मोबाइल चोरणाऱ्या झारखंडमधील चोरट्यांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून ५० मोबाइल संच जप्त करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cell phone theft in immersion procession citizens complained on polices lost and found portal pune print news rbk 25 mrj

First published on: 29-09-2023 at 12:51 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा