scorecardresearch

पुणे : नवीन मराठी शाळेच्या इमारतीची शताब्दीपूर्ती

नवीन मराठी शाळेच्या इमारतीची शनिवारी शताब्दीपूर्ती झाली. त्यानिमित्ताने दीपोत्सव आणि रोषणाई करण्यात आली होती.

Centenary celebration new Marathi school building
नवीन मराठी शाळेच्या इमारतीची शताब्दीपूर्ती (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पुणे : वारसा वास्तूचा दर्जा असलेल्या नवीन मराठी शाळेच्या इमारतीची शनिवारी शताब्दीपूर्ती झाली. त्यानिमित्ताने दीपोत्सव आणि रोषणाई करण्यात आली होती. शाळा यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, प्रबंधक डॉ. सविता केळकर, स्थापत्य विशारद रवींद्र कानडे, ज्योतीप्रकाश सराफ, मुख्याध्यापिका कल्पना वाघ या वेळी उपस्थित होत्या.

लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, माधव नामजोशी या थोर समाजसुधारकांनी १८८० मध्ये पुण्यात ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. मोरोबादादांचा वाडा, गद्रे वाडा अशा ठिकाणी शाळा भरू लागली. अल्पावधीत विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने आणि या शाळेस पूरक म्हणून प्राथमिक शाळा स्वतंत्र असावी असे ठरले. ठरवल्याप्रमाणे ४ जानेवारी १८९९ मध्ये नवीन मराठी शाळा नावाने होळकर वाड्यात शाळेचा नव्याने श्रीगणेशा झाला. महर्षी धोंडो केशव कर्वे हे शाळेचे पहिले मुख्याध्यापक म्हणून लाभले. ही शाळा यावर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असताना शाळेच्या मुख्य इमारतीस शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. असे दुहेरी ऐतिहासिक क्षण एकत्रित आले आहेत.

हेही वाचा – वारजेतील खंडणीखोर गुंड टोळीवर ‘मोक्का’

हेही वाचा – पुणे : शाळा संस्थापकाच्या बंगल्यात चोरी; परदेशी चलन, हिरेजडीत दागिने लंपास

ब्रिटिशकालीन मोठी दगडी इमारत, इंग्रजांच्या बांधकाम शैलीची छाप पूर्णतः या इमारतीवर दिसून येते. ओतीव लोखंडी गोलाकार मोठे खांब, अर्धगोलाकार कमानी, मोठ्या लोखंडी तुळया, उतरते कौलारू छप्पर, प्रशस्त आवार, प्रशस्त वर्ग, त्यात हवा उजेडासाठीचे झरोके, लाकडी व दगडी जिने, रोझ विंडोमधील घड्याळ, मोठा प्रार्थना हॉल, शालेय बाग, वृक्षसंपदेने बहरलेला परिसर हे देखणेपण आजही शाळा टिकवून आहे.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 22:52 IST

संबंधित बातम्या