पुणे : देशातील बाजारपेठेत गव्हाची मुबलक उपलब्धता राहावी. दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसू नये, म्हणून केंद्र सरकारने गहू निर्यातीवर बंदी आणली होती. पण, आता गव्हाच्या पिठाची निर्यात वाढली. ही निर्यात गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत उच्चांकी होती. त्यामुळे सरकार पुन्हा हस्तक्षेप करून गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवरही बंदी घालण्याचा विचार करीत आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गहू निर्यात बंदी करताच व्यापाऱ्यांनी गव्हाच्या पिठाची निर्यात करण्याचा मार्ग अवलंबला होता. जागतिक बाजारपेठेतून मोठी मागणी असल्यामुळे पिठाची निर्यात प्रचंड वाढली. देशातून दर वर्षांला सरासरी सहा हजार ते आठ हजार टन पिठाची निर्यात होते. पण, १३ मे रोजी गव्हाच्या निर्यातीला बंदी घातल्यापासून अचानक पिठाची निर्यात सात-आठ पटीने अधिक झाली आहे. निर्यात थांबवली नाही तर गहू निर्यात बंदीचा निर्णय फोल ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे, त्यामुळे केंद्र सरकार गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा गांभीर्याने विचार करीत आहे. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central government likely to ban wheat flour export zws
First published on: 24-06-2022 at 01:56 IST