पुणे : लोणावळा-कर्जत रेल्वे मार्गावर कोसळलेल्या दरडीमुळे रेल्वे वाहतूक सलग चौथ्या दिवशी विस्कळीत झाली असून, उद्यापासून (१० जुलै) शुक्रवारपर्यंत (१७ जुलै) ३० गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेकडून निवेदनाद्वारे ही माहिती देण्यात आली. सोमवारी (६ जुलै) मुसळधार पावसामुळे लोणावळा-कर्जत रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन झाले.
दरडींमुळे रेल्वे मार्गाचे नुकसान झाले. परिणामी, पुणे-मुंबईसह गुजरात, राजस्थान, दक्षिण भारत आणि उत्तर भारताकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. गेल्या चार दिवसांपासून या मध्य रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, पुणे-मुंबई दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत.
आता नुकसान झालेले रेल्वे मार्गांच्या देखभाल-दुरूस्तीच्या कामांना वेळ लागत असून, गाड्या अचानक रद्द करण्यात येत असल्याने होणारी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नियोजनासाठी मध्य रेल्वेकडून शुक्रवारपर्यंत दररोज धावणाऱ्या १४ गाड्या, वेगवेगळ्या कालावधीत धावणाऱ्या आणि विशेष १६ गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. त्यात पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस, उत्तर भारतातील गोरखपूर, जोधपूर, इंदौरकडे जाणाऱ्या गाड्या, दक्षिण भारतातील हुबळी, हैद्राबाद, चैन्नई या गाड्यांसह कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस आदी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
१० ते १७ जुलै दरम्यान दररोज धावणाऱ्या या गाड्या रद्द
१. (१७३१७) हुबळी – दादर एक्सप्रेस
२. (१७३१८) दादर – हुबळी एक्सप्रेस
३. (२२९४४) इंदूर – दौंड एक्सप्रेस
४. (२२९४३) दौंड – इंदूर एक्सप्रेस
५. (२२७३२) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हैदराबाद एक्सप्रेस
६. (२२७३१) हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
७. (१२१२४) पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन
८. (१२१२३) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे डेक्कन क्वीन
९. (११००७) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे डेक्कन एक्सप्रेस
१०. (११००८) पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन एक्सप्रेस
११. (१२१२७) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस
१२. (१२१२८) पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी एक्सप्रेस
१३. (२२१५७) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल
१४. (२२१५८) चेन्नई एग्मोर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट मेल
वेगवेगळ्या तारखांना सुटणाऱ्या या गाड्या रद्द
१५. (१७४११) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस
१६. (१७४१२) कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस महालक्ष्मी एक्सप्रेस
१७. (२०४९५) जोधपूर – हडपसर एक्सप्रेस
१८. (२०४९६) हडपसर – जोधपूर एक्सप्रेस
१९. (११०२८) सातारा – दादर एक्सप्रेस
२०. (११०२७) दादर – सातारा एक्सप्रेस
२१. (११०४१) दादर – साईनगर शिर्डी एक्सप्रेस
२२. (११०४२) साईनगर शिर्डी – दादर एक्सप्रेस
या विशेष गाड्या रद्द
२३. (०१०७९) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोरखपूर एक्सप्रेस
२४. (०१०८०) गोरखपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
२५. (०१४१५) पुणे – गोरखपूर एक्सप्रेस
२६. (०१४१६) गोरखपूर – हडपसर एक्सप्रेस
२७. (०१४३१) पुणे – गाझीपूर सिटी एक्सप्रेस
२८. (०१४३२) गाझीपूर सिटी – हडपसर एक्सप्रेस
२९. (०१४९१) पुणे – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस
३०.(०१४९२) हजरत निजामुद्दीन – पुणे एक्सप्रेस
रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून मध्य रेल्वेची टीम अहोरात्र काम करत असून, रेल्वे सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. गाड्यांच्या धावण्याबाबतच्या माहितीसाठी, प्रवासी रेल्वे हेल्पलाइनशी संपर्क साधू शकतात किंवा एनटीइएस ॲप तपासू शकतात. प्रवाशांच्या माहितीसाठी सोशल मीडियावरही वेळोवेळी अद्यतने दिली जात आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या या व्यत्ययाच्या काळात प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
