पुणे : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुणे ते मिरज ही नवीन विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी ६ जूनपासून सुरू होणार असून, ती साप्ताहिक असणार आहे.

पुणे-मिरज ही गाडी ६ जूनपासून दर मंगळवारी पुण्यातून सकाळी ८ वाजता रवाना होईल. ती दुपारी १ वाजून ४५ मिनि़टांनी मिरजला पोहोचेल. मिरजमधून ही गाडी दर मंगळवारी दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी सुटेल आणि पुण्यात रात्री ७ वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल. या गाडीला ४ सर्वसाधारण, ७ शयनयान, ५ थ्री एसी आणि २ टू एसी डबे आहेत. या गाडीला जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, सांगली हे थांबे आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

ltt thivim 3 hour late marathi news
मुंबई: प्रवाशांच्या गोंधळानंतर अखेर रेल्वेगाडी सुटली, एलटीटी-थिवी रेल्वेगाडी तब्बल तीन तास उशिरा
panvel nanded trains marathi news, 40 trains panvel to nanded marathi news
पनवेल – नांदेडदरम्यान ४० उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या
Wrist ticket, Metro 1, Mumbai,
मुंबई : ‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकीट सेवा कार्यान्वित
Pune-Daund suburban service,
रेल्वे प्रवाशांचा मतदानावर बहिष्कार! पुणे-दौंड उपनगरी सेवा सुरू होत नसल्याने पाऊल

पुणे ते मिरज या मार्गावर गाडी सुरू करावी, अशी प्रवाशांची खूप दिवसांपासून मागणी होती. अखेर रेल्वे प्रशासनाने ही मागणी मान्य केली आहे. त्यामुळे ही गाडी आता सुरू होत आहे. ही गाडी सुरू झाल्याने या मार्गावरील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.