पुणे : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुणे ते मिरज ही नवीन विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी ६ जूनपासून सुरू होणार असून, ती साप्ताहिक असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे-मिरज ही गाडी ६ जूनपासून दर मंगळवारी पुण्यातून सकाळी ८ वाजता रवाना होईल. ती दुपारी १ वाजून ४५ मिनि़टांनी मिरजला पोहोचेल. मिरजमधून ही गाडी दर मंगळवारी दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी सुटेल आणि पुण्यात रात्री ७ वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल. या गाडीला ४ सर्वसाधारण, ७ शयनयान, ५ थ्री एसी आणि २ टू एसी डबे आहेत. या गाडीला जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, सांगली हे थांबे आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway has decided to run a new special train from pune to miraj pune print news stj 05 amy
First published on: 01-06-2023 at 19:21 IST