पुणे : संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमटीडीसी) पर्यटक निवासांत पर्यटकांना पौष्टिक तृणधान्याचे खाद्यपदार्थ उपाहारगृहांमध्ये न्याहारीत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, तसेच कृषी विभागाशी समन्वय करून पौष्टिक तृणधान्याबाबत विविध कार्यक्रम राबविणे, स्थानिक शेत ते थेट पर्यटक अशा संकल्पना राबविणे, कृषी महाविद्यालयांशी समन्वय साधून महामंडळाच्या मोकळ्या जागेमध्ये ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी पौष्टिक तृणधान्याची लागवड करणे, स्थानिक शेतकऱ्याशी समन्वय करून महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये येणाऱ्या पर्यटकांची शेत सहल आयोजित करणे अशा संकल्पना अमलात आणून पर्यटकांना आरोग्यदायी पर्यटन घडवून आणावे, अशा सूचना एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यांनी दिल्या आहेत.

Maharashtras E-crop Inspection project has attracted the Central Government
महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ
Central government confirms purchase of five lakh metric tonnes of onions from Maharashtra
निवडणुकीत कांदाखरेदीचा प्रचार? महाराष्ट्रातून पाच लाख मेट्रिक टन कांदाखरेदीची केंद्राची ग्वाही
Postponement of physical test of PSI by MPSC Pune print news
एमपीएससीकडून ‘पीएसआय’ची शारीरिक चाचणी लांबणीवर
Drug supply to Delhi
अमली पदार्थ प्रकरणातील शोएबकडून दोनदा दिल्लीस कोट्यवधींचा पुरवठा

हेही वाचा – मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर छापे; राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यावर ‘ईडी’ची कारवाई

या पार्श्वभूमीवर पौष्टिक तृणधान्यांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा या पिकांचा समावेश होतो. पौष्टिक तृणधान्ये लोह, कॅल्शियम, झिंक, आयोडीन इ. सारख्या सूक्ष्म पोषक घटकाने समृद्ध आहेत. पौष्टिक तृणधान्य आधारित पदार्थ कॅल्शियमची कमतरता कमी करू शकत असल्याने आहारामध्ये त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. या पिकांचे येणाऱ्या पर्यटकांच्या आहारातील प्रमाण वाढविण्यासाठी विविध उपक्रम पर्यटन महामंडळाकडून राबविण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने सर्व उपाहारगृहांमध्ये पौष्टिक तृणधान्य ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा पिकांच्या विविध आणि रुचकर पाककृती तयार करून त्यांचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. तृणधान्यांपासून तयार केलेले पदार्थ पर्यटकांना वर्षभर उपाहारगृहात उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती औरंगाबादचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली.

हुरडा पार्टीचे आयोजन

पर्यटक निवास / उपाहारगृहाच्या दर्शनी भागात पौष्टिक तृणधान्य पदार्थ उपलब्धतेबाबत आणि त्यांच्या आहारमुल्याबाबत फलक बोधचिन्हासह लावण्यात येणार आहेत. स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने अजिंठा उपाहारगृह, लोणार, फर्दापूर, औरंगाबाद, वेरूळ, नाशिक, सोलापूर यांसह पुणे, कोकण विभागातील अशा इतर प्रादेशिक कार्यालयांच्या ठिकाणी हुरडा पार्टीचे (ज्वारी) आयोजन करण्यात येणार आहे.

हेही वाचा – पुणे-मुंबई दरम्यान पुन्हा थेट विमानसेवा; लोहगाव विमानतळ प्रशासनाकडून हालचाली सुरू

स्थानिक बचत गट, शेतकरी यांच्यामार्फंत नाचणीचे वाळलेले खाद्यपदार्थ (पापड, कुरड्या, बिस्किट) पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. शक्य असलेल्या ठिकाणी स्थानिक अल्प भू-धारक शेतकरी यांना महामंडळाच्या पर्यटक निवासात पौष्टिक तृणधान्यांचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी स्टॉल उभा करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे, असेही हरणे यांनी सांगितले.