पिंपरी नाट्य परिषदेतर्फे प्रशांत दामले यांना मानपत्र | Certificate of Honor to Prashant Damle by Pimpri Natya Parishad pune print news Bej 15 amy 95 | Loksatta

पिंपरी नाट्य परिषदेतर्फे प्रशांत दामले यांना मानपत्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी- चिंचवड नाट्य परिषदेच्या वतीने सिनेनाट्य अभिनेते प्रशांत दामले यांना मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

पिंपरी नाट्य परिषदेतर्फे प्रशांत दामले यांना मानपत्र
पिंपरी नाट्य परिषदेतर्फे प्रशांत दामले यांना मानपत्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी- चिंचवड नाट्य परिषदेच्या वतीने सिनेनाट्य अभिनेते प्रशांत दामले यांना मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे.चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सोमवारी ( १२ डिसेंबर) सायंकाळी पाच वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. त्यानंतर दामले यांची प्रकट मुलाखत होणार आहे.

हेही वाचा >>>पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानासाठी मंगळवारी पुणे बंद

मुलाखतीनंतर ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हा नाट्यप्रयोगही होणार असून तो सर्वांसाठी विनामूल्य आहे. प्रवेशिका नाट्यगृहात उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी दिली.यासंदर्भात भोईर म्हणाले की, शहरवासीयांच्या वतीने हे मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे. मराठी नाटक आणि चित्रपट सृष्टीत दामले यांनी बहुमोल योगदान दिले आहे. त्यासाठी हा सत्कार सोहळा आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 18:17 IST
Next Story
पिंपरीः कचरा विलगीकरण न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई; अतिरिक्त आयुक्तांचे आदेश