Premium

चाकण: एक कोटींच्या खंडणीसाठी व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी; घरच्यांचा गेम करेल म्हणाऱ्या आरोपींना ठोकल्या बेड्या

१ कोटींच्या खंडणीसाठी व्यावसायिकाला धमकी देणाऱ्या पाच जणांना पिंपरी- चिंचवडच्या चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

chakan police arrest five for threatening businessman for extortion of 1 crore
व्यावसायिकाला खंडणी मागणाऱ्या आरोपींना चाकण पोलिसांनी केली अटक

खेडच्या पाईट या ठिकाणी नेऊन व्यवसायिकला दिली होती जीवे मारण्याची धमकी

१ कोटींच्या खंडणीसाठी व्यावसायिकाला धमकी देणाऱ्या पाच जणांना पिंपरी- चिंचवडच्या चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संजय धुलाप्पा कुरुंदवाडे यांना सहा ते सात जणांनी धमकावत एक कोटींची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास कुटुंबातील व्यक्तींचा गेम करू अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याने ते चाकण पोलिसात गेले होते. चाकण पोलिसांनी सापळा रचून पाच जणांना अटक केली असून दोन जणांचा शोध पोलीस घेत आहेत. शुभम उर्फ सोन्या विनोद काकडे, आकाश विनायक भुरे, शुभम युवराज सरवदे, अजय नंदू होले, नवनाथ शांताराम बच्छे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अनैतिक संबंधातून उपाहारगृहचालकाचा खून झाल्याचे उघडकीस, महिलेसह चौघे गजाआड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय कुरुंदवाडे हे आळंदी फाटा येथील वर्कशॉपमधून एकता नगरच्या दिशेने निघाले. त्यांना पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्यांची गाडी अडवली. त्यांनाच तुम्ही माझ्या गाडीला धडक दिली असं म्हणत अरेरावी केली. माझी गाडी दुरुस्त करून द्या, असं म्हणत त्यांना बळजबरीने रिक्षात बसवले आणि खेड परिसरातील पाईट या ठिकाणी निर्जनस्थळी नेऊन तू व्यवसायिक आहेस तू आम्हाला एक कोटी दे, तसं न केल्यास आम्ही तुझ्या घरच्यांचा गेम करू असं म्हणत धारदार शस्त्र दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या संजय कुरुंदवाडे यांनी ही बाब कोणाला सांगितली नाही.

हेही वाचा >>> प्रसिद्ध पर्यटनस्थळ लोणावळा येथे आधी पर्यटक मुलींचं अपहरण, मग सामूहिक बलात्कार, पोलिसांकडून मोठी कारवाई

दुसऱ्याच दिवशी ठरल्याप्रमाणे बारा लाख रुपयांची सोय केली का? म्हणून आरोपींचा फोन आला. यामुळे ते आणखी घाबरले. शिवाय, आरोपी हे वेगवेगळ्या नंबर वरून फोन करत होते. खंडणीसाठी वारंवार येत असलेल्या फोनमुळे संजय हे देखील त्रस्त झाले होते. अखेर ही बाब नातेवाईक आणि मित्रांना सांगितल्यानंतर त्यांनी चाकण पोलिसात तक्रार द्यायची ठरवली. खंडणीसाठी आरोपींचा फोन आला आणि संबंधित रक्कम ही नाणेकरवाडी या ठिकाणी असलेल्या एटीएमच्या शेजारी कचऱ्याच्या डब्यात पैशाची बॅग ठेवण्यास सांगितली. पोलिसांनी देखील सापळा रचला आणि पैसे घेण्यास आलेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या असून दोन जण फरार आहेत. त्यांचा शोध चाकण पोलीस घेत आहेत. ही कामगिरी चाकण पोलिसांनी केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chakan police arrest five for threatening businessman for extortion of 1 crore kjp 91 zws

First published on: 01-10-2023 at 23:11 IST
Next Story
अनैतिक संबंधातून उपाहारगृहचालकाचा खून झाल्याचे उघडकीस, महिलेसह चौघे गजाआड