सौदे बंद झाल्याचा परिणाम; आवकही कमी

पुणे : ऐन सणासुदीत कच्चा चणा, चणा डाळ, बेसन, भाजलेली डाळ महाग झाली आहे. वायदे बाजारात चणा डाळीचे सौदे करण्यास बंदी घालण्यात आली आहे, तसेच मागणीच्या तुलनेत परराज्यातून चण्याची आवक कमी होत असल्यामुळे घाऊक बाजारात चणा डाळीच्या दरात क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांनी, तर किरकोळ बाजारातही प्रतिकिलोमागे आठ ते दहा रुपयांनी वाढ झाली आहे. गौरी-गणपती तसेच दिवाळीपर्यंत चणा डाळ, बेसन, भाजक्या डाळीला मागणी अधिक राहणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांतून कच्च्या चण्याची आवक होते. चणा डाळीपासून बेसन तयार केले जाते. चणा डाळ आणि बेसनाला वर्षभर मागणी असते. श्रावण महिन्यानंतर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी हे सण येतात. सणासुदीच्या काळात चणा डाळ, बेसन आणि भाजलेल्या डाळीला मागणी वाढणार आहे, असे पुणे मार्केट यार्डातील चणा डाळ व्यापारी सुमित गुंदेचा यांनी सांगितले.

the Meteorological Department has predicted unseasonal rain with gale force winds in Maharashtra Pune news
राज्यात दोन दिवस पावसाचे; विदर्भाला गारपिटीपासून दिलासा ?
Red orange and yellow alert for rain in many parts of the state
राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट
Kerala bjp campaign
केरळमध्ये तिसरा पर्याय निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न
Sudhir Singh murder case
सुधीर सिंग हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला अटक, उत्तर प्रदेशच्या जंगलात पेल्हार पोलिसांचा थरारक पाठलाग

‘एनसीडीईएक्स’ बाजारात बाजरी, सोयाबीन, पामतेल, धने, जिरे, हळद अशा अन्नधान्यांचा सौदा होतो. मात्र, या सौद्यातून कच्च्या चण्याचे सौदे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे क्विंटल आणि ५० किलोच्या (कट्टा) दरात वाढ झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.

मुख्य कारण…

सेबीने (सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड) नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्हज एक्स्चेंजवर (एनसीडीईएक्स) होणाऱ्या चणा करारावर बंदी घातली आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात चणा डाळीच्या दरात वाढ झाली आहे.

तीन ते चार वर्षांपूर्वी बाजारात चण्याचे सौदे करण्यास बंदी घालण्यात आली होती. त्या वेळीही चणा डाळीचे दर वाढले होते. गौरी-गणपतीत चणा डाळ आणि पिठाला मागणी वाढते. सध्या बाजारात परराज्यांतून चणा डाळीची आवक कमी होत असल्याने दरात वाढ झाली आहे. – सुमित गुंदेचा, चणा डाळ व्यापारी, पुणे मार्केट यार्ड