पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात शुक्रवारी संध्याकाळी सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी होती. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार रात्री उशिराही शहरात पावसाची शक्यता आहे. शहरात प्रामुख्याने शिवाजीनगर आणि शहरालगतच्या घाट विभागामध्ये पावसाचे प्रमाण अधिक राहणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे शहरात शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. सुमारे अर्धा ते पाऊन तासामध्ये शिवाजीनगर केंद्रावर ३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले. त्यातून वाहतुकीची कोंडी झाली. संध्याकाळी कार्यालये सुटण्याच्या वेळेलाच पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. संध्याकाळी सहानंतर पावसाने उघडीप दिली. मात्र, साडेआठच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली. रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास हवामान विभागाच्या यंत्रणेमध्ये पुणे शहराच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर ढग जमा होताना दिसत होते. त्यामुळे शहरात रात्री उशिरापर्यंत पावसाची हजेरी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शहरालगतच्या घाट विभागांत पावसाचे प्रमाण शहरापेक्षा अधिक राहण्याचा अंदाज रात्री हवामान विभागाकडून देण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chance of rain in pune even late at night pune print news zws
First published on: 30-09-2022 at 23:27 IST