scorecardresearch

पुणे शहर आणि परिसरात संध्याकाळनंतर दोन टप्प्यांत पावसाची शक्यता

संध्याकाळी चार ते सहा आणि सात ते दहा अशा दोन टप्प्यांत पुणे शहरात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.

Chance of rain pune city
पुणे शहर आणि परिसरात संध्याकाळनंतर दोन टप्प्यांत पावसाची शक्यता (संग्रहित छायाचित्र)

पुणे – संध्याकाळी चार ते सहा आणि सात ते दहा अशा दोन टप्प्यांत पुणे शहरात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. यांपैकी संध्याकाळी सातनंतर होणारा पाऊस हा घाट परिसरात, तसेच शहराच्या बाहेर उपनगर परिसरात होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – पुणे : संपाचा मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांना फटका; पुण्यातील महसुलात घट

हेही वाचा – दहावीची गणिताची प्रश्नपत्रिका महिला सुरक्षारक्षकाच्या मोबाईलमध्ये आढळल्याने खळबळ

१८ मार्चपर्यंत राज्याच्या विविध भागांमध्ये वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पावसाचे प्रमाण हलक्या सरींपर्यंत मर्यादित राहणार असले तरी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 13:40 IST