पुण्यात महानगरपालिका परिसरात भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी निवेदन स्विकारण्यास नकार दिल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात किरीट सोमय्या पायऱ्यांवर पडल्याचीही घटना घडली. यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या हल्ल्यावर पहिली प्रतिक्रिया दिली. किरीट सोमय्या अशा हल्ल्यांमुळे घाबरणाऱ्यांमधील नाहीत, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. पायाखालची वाळू घसरल्याने सभ्यतेचा बुरखा फाटल्याचं म्हणत पाटलांनी टोला लगावला. ते पुण्यात बोलत होते.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, “मुद्दे संपले की माणसं गुद्यावर येतात. पायाखालची वाळू घसरली की सभ्यतेचा बुरखा फाटून मूळ चेहरा समोर येतो. किरीट सोमय्या घाबरणाऱ्यांमधले नाहीत. त्यांचा प्रकरणे काढण्याचा इतिहास आहे. अनेकांना त्यांनी घरी पाठवलं आहे.”

BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
buldhana murder marathi news, buldhana ambedkar jayanti murder marathi news
बुलढाण्यात भीम जयंतीला गालबोट! चाकूहल्ल्यात युवक ठार; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पोलिसांवर होता दुहेरी ताण
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

शिवसेनेने केलेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध : चंद्रकांत पाटील

अख्ख्या महाराष्ट्राचं सरकार भाजपच्या कार्यकर्त्यांना गावोगावी त्रास देत आहे, असाही आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. तसेच आम्ही कायदेशीर कारवाई करू, आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत, असं म्हणत शिवसेनेला इशारा दिला.

नेमकं काय घडलं?

किरीट सोमय्या शनिवारी (५ फेब्रुवारी) आधी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथे त्यांनी पुणे जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. यानंतर सोमय्या तेथून पुणे महानगरपालिकेत आयुक्तांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना निवेदन स्विकारण्याची मागणी केली. मात्र, सोमय्यांनी हे निवेदन स्विकारलं नाही. यावर आक्रमक शिवसेना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली.

व्हिडीओ पाहा :

शिवसेना कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर पोलिसांनी किरीट सोमय्यांना घटनास्थळावरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पायऱ्यांवर पडले. यानंतर पोलिसांनी सोमय्या यांना तिथून बाजूला नेत गाडीत बसवले.

पोलिसांनी किरीट सोमय्या यांना गाडीत बसवल्यानंतरही आक्रमक शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवरही हल्ला चढवला. काही कार्यकर्ते गाडीच्या समोर आले, तर काही कार्यकर्त्यांनी गाडीच्या मागच्या बाजूने हल्ला केला.

हल्ल्यावर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया

शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या यांनी स्वतः याची माहिती देत ट्वीट केलंय. ते म्हणाले, “माझ्यावर शिवसेनेच्या गुंडांनी पुणे महानगरपालिकेच्या आवारात हल्ला केला आहे.”

हेही वाचा : VIDEO: पुण्यात राडा, शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पडले पायरीवर

दरम्यान, किरीट सोमय्या या हल्ल्यानंतर संचिती हॉस्पिटलला दाखल झाले. या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.